Dilip Kumar Nephew Photos: भारतीय सिनेमामध्ये ट्रेजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आज या जगात नाहीत. पण दिलीप कुमार यांच्या नावाचा उल्लेख होताच त्यांचे गाजलेले सिनेमे, अभिनयशैली डोळ्यांसमोर जिवंत होतात. 'राम और श्याम', 'शक्ती' यासारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी इंडस्ट्रीला दिले आहेत. दिलीप कुमार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही सिनेसृष्टीत योगदान दिलंय, काही मंडळी आजही कार्यरत आहेत. दिलीप कुमार यांचे पुतणे आणि अभिनेते अयुब खान यांनीही मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता.
अयुब खान यांचे वडील नासिर खान आणि आई बेगम पारा हे देखील अभिनय क्षेत्रामध्ये होते. कुटुंबीयांकडूनच त्यांना अभिनयाचा वारसा लाभला, सह कलाकार म्हणून काही होईना पण त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या.
अयुब खान यांनी वर्ष 1992मध्ये 'माशूक' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेमामध्ये अभिनेत्री आएशा झुल्का (Ayesha Jhulka) आणि अयुब यांची मुख्य भूमिका होती.
1994मध्ये रिलीज झालेल्या 'सलामी' सिनेमाद्वारे अयुब यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या रोमँटिक अॅक्शनपटाचे दिग्दर्शन शारुख सुल्तान यांनी केले होते. या सिनेमाला बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
पण यानंतर अभिनेता म्हणून त्यांचा एकही सिनेमा चालला नाही आणि त्यांना सिनेमामध्ये साइड रोड मिळू लागले. वर्ष 1997मध्ये रिलीज झालेल्या 'मृत्युदंड' सिनेमामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित त्यांच्या हीरोइनच्या भूमिका होती.
सहकलाकार म्हणून अयुब खान यांनी 'दिल चाहता है', 'कयामत', 'गंगाजल, 'एलओसी-कारगिल' आणि 'अपहरण' यासारख्या सिनेमांमध्ये काम केले. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'दोस्ती जिंदाबाद' सिनेमामध्येही ते झळकले होते.
अयुब खान यांनी मालिकांमध्येही काम केलंय. महाभारत मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
अयुब खान यांनी आतापर्यंत छोट्या पडद्यावरील 25 हून अधिक कार्यक्रमांमध्ये काम केलंय. 'शक्ति', 'तेरे इश्क में घायल', 'स्पाय बहू', 'गुड़ से मीठा इश्क', 'रंजू की बेटियां', 'जिंदगी अभी बाकी है मेरे घोस्ट' यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ते झळकले आहेत.
वर्ष 2023-24 दरम्यान छोट्या पडद्यावरील 'नीरजा- एक नई पहचान' या मालिकेमध्येही अयुब खान झळकले होते.
56 वर्षीय अयुब खान दोन मुलींचे पिता आहेत.