पुन्हा जबरदस्तीने लिपलॉक! उदित नारायण यांचा नवा VIDEO; नेटकरी म्हणाले, 'सिरीयल किसर...'

उदित नारायण यांच्या या व्हिडिओमुळे माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता उदित नारायण यांच्या नव्या व्हिडिओने गोंधळ उडाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Udit Narayan Viral Video:  बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदीत नारायण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी उदित नारायण यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यामध्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये तरुणींना किस केल्याचे पाहायला मिळाले. उदित नारायण यांच्या या व्हिडिओमुळे माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता उदित नारायण यांच्या नव्या व्हिडिओने गोंधळ उडाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आपल्या सदाबहार गाण्यांनी हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. लीकडेच एका लाईव्ह शो दरम्यान उदित एका महिला चाहत्याला लिप-किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर बराच गोंधळ झाला. नेटकऱ्यांनी उदित नारायण यांच्या या व्हिडिओवरुन जोरदार टीका केली होती. अशातच आता उदीत नारायण यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये,अनेक महिला चाहत्या स्टेजजवळ येऊन उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. याचवेळी उदित नारायण एका महिला चाहत्याला किस करताना दिसत आहेत. ते आधी महिलेच्या गालाचे चुंबन घेतात त्यानंतर तिच्या ओठांवर किस करतात. त्यांचा हा प्रताप पाहून महिलाही गोंधळल्याचे दिसत आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. काही नेटकऱ्यांनी मार्केटमध्ये नवा सिरीयल किसर आल्याचे म्हणत उदित नारायण यांच्या कृतीवर टीका केली आहे. तर अनेकांनी बुढापे में जवानी म्हणत त्यांची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. 

Advertisement

दरम्यान, माझ्या चाहत्यांमध्ये आणि माझ्यामध्ये एक खोल आणि अतूट बंध आहे. तुम्ही या तथाकथित व्हिडिओमध्ये जे पाहिले ते माझ्या चाहत्यांमधील आणि माझ्यातील प्रेमाचे प्रकटीकरण आहे. ते मला प्रेम करतात आणि मी त्यांना आणखी प्रेम करतो. स्टेजवर जे घडले ते काही नवीन नाही, चाहत्यांनी प्रेम दाखवले ही आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणत उदित नारायण यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. 

( नक्की वाचा :  Delhi Exit Poll : दिल्लीमध्ये 'AAP' ची पुन्हा सत्ता की भाजपाचं 27 वर्षांनी कमबॅक? पाहा काय आहे अंदाज )