Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मात्र असेल मोठा बदल?

गेल्या वर्षी काही कारणास्तव बंद झालेला विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गेल्या वर्षी काही कारणास्तव बंद झालेला विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होणार आहे. भरभरून हसवणारं चला हवा येऊ द्या प्रेक्षकांसाठी पुन्हा प्रेक्षकांसाठी दाखल झालं आहे. झी मराठीने नुकताच यासंदर्भातील प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वाची अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. 

२०१४ पासून चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याने या वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम मराठीत सुरू केला. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले होते. भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे, तुषार देवल, अंकुर वाढवे आणि यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारूढ केलं. 

Advertisement

नक्की वाचा - कापूस विकून 100 रुपये कमावायचा, एक वेब सीरीज मिळाली अन् 'या' अभिनेत्याचं नशिबचं पालटलं

अद्याप झी मराठीकडून कार्यक्रमाची नेमकी तारीख दिलेली नाही. दरम्यान चहा हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये दिल्या प्रमाणे कॉमेडीचा किंग बनण्यासाठी आता ऑडिशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आगामी येणाऱ्या कार्यक्रमात नव्या चेहऱ्यांना संधी देणार आणि जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Topics mentioned in this article