Hollywood Love Story: प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांचा शेर, 'इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश 'गालिब', कि लगाए न लगे और बुझाए न बने', हॉलीवूडची आयकॉनिक गायिका आणि अभिनेत्री शेर (Cher) आणि तिचा 39 वर्षीय बॉयफ्रेंड, संगीतकार अलेक्झांडर एडवर्ड्स (Alexander Edwards) यांच्या नात्यावर तंतोतंत लागू होतो. 79 वर्षांच्या शेर आणि अलेक्झांडर यांच्या वयातील 40 वर्षांचे मोठे अंतर आहे. त्यांची लव्हस्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
प्रेम गणिताचे नियम पाळत नाही' (Love Math Doesn't Know) हे शेर यांनी काही काळापूर्वी दिलेले वक्तव्य त्यांच्या आणि अलेक्झांडरच्या नात्याला पूर्णपणे लागू पडते.
कधी झाली भेट?
शेर आणि अलेक्झांडर यांची भेट 2022 मध्ये पॅरिस फॅशन वीकमध्ये झाली. त्यावेळी अलेक्झांडर 36 वर्षांचे होता. नोव्हेंबर 2022 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये एका डिनर डेटदरम्यान दोघांनी एकमेकांचा हात हातामध्ये घेतला होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि त्यांच्या नात्याची अधिकृतपणे सुरुवात झाली.
कशी आहे लव्हस्टोरी?
'द केली क्लार्कसन शो' (The Kelly Clarkson Show) वर बोलताना शेर यांनी या नात्याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या "कागदावर हे हास्यास्पद वाटू शकते, परंतु खऱ्या आयुष्यात आम्ही आश्चर्यकारक पद्धतीने जुळवून घेतो. तो उत्कृष्ट आहे."
मे 2023 मध्ये या जोडप्याच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या, परंतु जानेवारी 2024 मध्ये शेर यांनी सोशल मीडियावर अलेक्झांडरसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्यांचं नातं कायम असल्याचं जगला सांगितलं. "लव्ह इज लव" (Love Is Love) असे लिहिले होते.
अलेक्झांडरचा 'भूतकाळ' चर्चेत
अलेक्झांडर एडवर्ड्स यांचा भूतकाळही चर्चेत राहिला आहे. ते 2018 ते 2021 पर्यंत मॉडेल एम्बर रोज (Amber Rose) सोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांना 5 वर्षांचा स्लॅश इलेक्ट्रिक अलेक्झांडर (Slash Electric Alexander) नावाचा मुलगा आहे. एम्बरने ब्रेकअपनंतर अलेक्झांडरवर धोका दिल्याचा आरोप केला होता, परंतु शेर यांनी याकडे दुर्लक्ष केले.
नुकतेच, शेर रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम इंडक्शन (Rock and Roll Hall of Fame Induction) मध्ये अलेक्झांडर आणि त्यांचा मुलगा स्लॅश यांच्यासोबत दिसल्या आणि त्यांनी एकत्र पोज दिले. अलेक्झँडरने त्यांना आगामी दोन नवीन अल्बमसाठी गाणी दिली आहेत, असंही शेर यांनी सांगितलं. त्यामधून हे दोघं वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यवसायातही एकत्र असल्याचं दिसून येत आहे.
आता हे नाते लग्नापर्यंत पोहोचेल का, हे पाहावे लागेल.