भारतमातेचे वादग्रस्त चित्र एम.एफ हुसेन यांचे नव्हतेच', पुतण्याचा मोठा दावा

भारतमातेच्या वादग्रस्त चित्रावरुन झाला होता. मात्र वादग्रस्त भारत माता चे चित्र एम एफ हुसेन यांचे नव्हतेच" असा सर्वात मोठा दावा त्यांचे पुतणे फिदा हुसेन यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maqbool Fida Husain controversial Painting: देशातील महान चित्रकारांपैकी एक मानले जाणारे मकबूल फिदा हुसेन हे जितके लोकप्रिय होते तितकेच ते वादग्रस्तही होते. त्यांच्या चित्रांमधून अनेकदा वादाच्या ठिणग्या पडायच्या. असाच वाद त्यांच्या भारतमातेच्या वादग्रस्त चित्रावरुन झाला होता. मात्र वादग्रस्त भारत माता चे चित्र एम एफ हुसेन यांचे नव्हतेच" असा सर्वात मोठा दावा त्यांचे पुतणे फिदा हुसेन यांनी केला आहे.

पत्रकार मयुरी डोंगरे यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना, फिदा यांनी सांगितले की, हुसेन नेहमीच म्हणत असत की,"ते चित्र दुसऱ्या एखाद्या कलाकाराने यांच्या शैलीची नक्कल करून, हुसेन नावाने प्रसिद्ध केले असावे. ते पेंटिंग मी रेखातलेच नाही."  कतरच्या दोहा शहरात, एम.एफ. हुसेन यांना समर्पित, जगातील पहिलं आणि सर्वात मोठं संग्रहालय, येत्या नोव्हेंबर मध्ये उघडलं जाणार आहे. 'लाव्ह वा कलम' नावाच्या या म्युझियमच्या रचनेत, स्वतः मकबूल फिदा हुसेन यांचा सहभाग होता. 1950 ते 2011 पर्यंतच्या त्यांच्या आर्ट क्षेत्रातील प्रवासाचा आढावा या म्युझियममध्ये घेता येईल. या बातमीवर दुजोरा देत आणि आनंद व्यक्त करत फिदा हुसेन  पॉडकास्ट मध्ये बोलत होते.

Rashmika Mandana: साऊथ सुंदरीचं ठरलं! रश्मिका मंदाना- विजय देवरकोंडाने उरकला साखरपुडा, लग्नाची तारीखही समोर

पद्मविभूषण एम एफ हुसेन यांच्या शेवटच्या आणि कठीण काळात फिदाच त्यांच्यासोबत होते. फिदा म्हणतात की एम एफ हुसेनना भारत कधीच सोडायचा नव्हता, ते सतत भारतात परत येण्याच्या प्रयत्नात होते. वयाच्या ९० व्या वर्षी, भारतीय पासपोर्ट सोडून कतरची नागरिकता घेताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते असं ही त्यांनी सांगितलं.

तसेच राज्य सभा खासदार असलेल्या एम एफ हुसेन यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे अनेकदा मदत मागितली होती, पण त्यांना कोणताही आधार मिळाला नाही. देशभरातील १२०० हून अधिक खटल्यांचा सामना करत असताना, हुसेन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आणि म्हटले होते की, “जर त्या वेळी भाजप सत्तेत असती, तर मी भारतात परतलो असतो.” पॉडकास्टमध्ये त्यांच्या हलक्या-फुलक्या आठवणी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याबद्दलच्या त्यांच्या प्रसिद्ध आकर्षणाचा, त्यांच्या सततच्या controversies चा ही उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, पंढरपूरच्या एका गरीब घरात जन्माला आलेले हुसेन जागतिक दर्जाचे मॉडर्न आर्ट कलावंत म्हणून उभे राहिले. त्यांच्या चित्रांची किंमत आज भारतात आणि जगभरात रेकॉर्ड दराने लावली जाते. भारताबाहेर जाणं भले ही त्यांना वैयक्तिक दृष्ट्या कठीण गेलं असलं तरी, याच काळाने त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ती आणखीन वेगाने वाढवली.