Dharmendra Love Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वावर अनेक अभिनेत्री जीव ओवाळत. ते विवाहित असूनही अनेक अभिनेत्रींचा त्यांच्यावर क्रश होता. याचीच प्रचिती 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांच्या प्रेमातून आली होती, ज्यांनी धर्मेंद्र विवाहित असतानाही त्यांच्याशी लग्न केले. मात्र, धर्मेंद्र यांचा हा प्रवास इथेच थांबला नाही. प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांना पत्नी म्हणून स्वीकारल्यानंतरही, धर्मेंद्र यांचे मन त्यांच्यापेक्षा तब्बल 26 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री अनीता राज यांच्यातही गुंतले होते, अशी त्या काळात चर्चा होती. अनिता राजला आपल्या प्रत्येक चित्रपटात नायिका म्हणून कास्ट करण्याची धर्मेंद्र यांची इच्छा होती.
काय आहे लव्ह स्टोरी?
धर्मेंद्र यांच्या लव्ह लाईफचे किस्से सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनय यामुळे अनेक जणी त्यांच्यावर भाळल्या होत्या. हेमा मालिनी यांनी देखील विवाहित असूनही त्यांच्याशी लग्न केले. मात्र, यानंतरही धर्मेंद्र यांचे प्रेम थांबले नाही. प्रकाश कौर आणि हेमा मालिनी या दोघी पत्नी असताना, धर्मेंद्र अनिता यांच्यात गुंतले होते, असे किस्से त्या काळात चर्चेत होते. विशेष म्हणजे, अनीता राज यांनाही धर्मेंद्र आवडायचे.
अनीता राज या धर्मेंद्र यांच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान होत्या. या दोघांमधील जवळीक वाढल्यानंतर धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटांमध्ये अनीता राज यांनाच नायिका म्हणून कास्ट करण्याची शिफारस करायला सुरुवात केली होती.
( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
अनीता राज यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान
अभिनेत्री अनीता राज यांना 'प्रेम गीत' आणि 'नौकर बीवी का' यांसारख्या चित्रपटांमुळे ओळख मिळाली. त्यांनी 1981 मध्ये 'प्रेम गीत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 1996 पर्यंत त्यांनी सतत चित्रपटांमध्ये काम केले.
धर्मेंद्र आणि अनीता राज यांनी 'नौकर बीवी का' या चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच, 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'करिश्मा कुदरत का' या चित्रपटात या दोघांचा ऑन-स्क्रीन रोमान्स प्रेक्षकांनी पाहिला होता.
अनीता राज यांनी 1986 मध्ये अभिनेता सुनील हिंगोरानी यांच्याशी विवाह केला. सुनील हिंगोरानी हे देखील त्यांच्यासोबत 'करिश्मा कुदरत का' चित्रपटात दिसले होते. या दाम्पत्याला शिवम हिंगोरानी नावाचा मुलगा आहे, जो 'ये जवानी है दिवानी' आणि 'अग्नीपथ' यांसारख्या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.
लग्नानंतर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अनीता राज यांनी 2007 मध्ये 'थोडी लाइफ थोडा मैजिक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. आज त्या चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये कावेरीची भूमिका करत आहेत.
मागील वर्षी रिलीज झालेल्या 'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटात त्या अंतराच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. याशिवाय, त्यांनी 'चार दिन की चांदनी', 'यारम', 'मुद्दा 370 जे अँड के' आणि 'लफ्जों में प्यार' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
फिटनेसकडे विशेष लक्ष
सध्या 62 वर्षांच्या असलेल्या अनीता राज फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखल्या जातात. त्या जिममध्ये केलेले जोरदार वर्कआऊट्स (Heavy Workout) करतानाचे व्हिडिओज (Videos) नियमितपणे त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर करत असतात.