बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या जीवनातील एका भावनिक आणि अपूर्ण प्रेम कहाणीची सध्या चर्चा आहे. त्यांची ही पहिली प्रेमकथा भारत-पाकिस्तान फाळणीमुळे (India-Pakistan Partition) अपूर्ण राहिली. धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होत आहे. मग त्यांची संपत्ती असो की त्यांची दोन लग्न असो याची सध्या चर्चा सुरू आहे. पण धर्मेंद्र यांचे पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना मग आपण तेच जाणून घेणार आहोत. धर्मेंद्र यांची अपूर्ण राहीलेली ही प्रेम कहाणी आहे.
शाळेतील निरागस प्रेम
धर्मेंद्र यांनी त्यांच्या बालपणीच्या या प्रेमकथेचा खुलासा दस का दम या टीव्ही शोमध्ये केला होता. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा बॉबी देओल (Bobby Deol) होता. पंजाब (Punjab) मधील एका लहानशा गावात ते सहाव्या इयत्तेत शिकत होते. त्याच वेळी त्या शाळेत आठव्या इयत्तेत एक मुलगी शिकत होती. तिचं नाव हमीदा (Hamida) होतं. ती त्या शाळेतील शिक्षकेची मुलीगी होती. तिच्यावर धर्मेंद्र यांचे पहिले प्रेम जडले होते. हे प्रेम पूर्णपणे निरागस होते. कारण त्या वेळी दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या. धर्मेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे, "आम्ही मनातल्या मनात बोलत राहायचो, पण समोरच्याला काहीच माहीत नव्हतं.
फाळणीने दोघे झाले वेगळे
दुर्दैवाने, 1947मध्ये झालेल्या भारताच्या विभाजनामुळे ही प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. फाळणीनंतर हमीदा आणि तिचे कुटुंब पाकिस्तान (Pakistan) मध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतर दोघांची कधीच भेट झाली नाही. हमीदा च्या आठवणींना धर्मेंद्र यांनी कवितांमधून वाट मोकळी करून दिली. त्यांनी लिहिलेल्या कवितेतील काही ओळी त्यांच्या मनातल्या भावनिक चलबिचलतेचे चित्रण करतात. ते लिहीतात
वो खामोश रहती, मैं सर झुका देता.
वो पूछती कुछ और थी, मैं कह कुछ और जाता था.
वो कहती, ‘उदास मत हो धरम, तेरे इम्तिहान में सब ठीक हो जाएगा.'
कहकर चली जाती, मैं देखता रह जाता...
वो ओझल हो जाती, मैं सोचता रह जाता, सवाल क्या है, यार?”
पुढील जीवन प्रवास
धर्मेंद्र यांच्या व्यावसायिक जीवनाप्रमाणेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. त्यांनी पुढे पहिल्या प्रेमातून बाहेर पडले पसंत केले. नंतर वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजेच 1954 मध्ये त्यांनी प्रकाश कौर(Prakash Kaur) यांच्याशी पहिला विवाह केला. पुढे,1970 मध्ये 'तुम हसीन मैं जवान'च्या सेटवर त्यांची भेट हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी झाली. पहिल्या भेटीतच ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. त्यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहीत असतानाही त्यांनी पुढे 1979 मध्ये हेमा मालिनी यांच्या सोबत विवाह केला.