टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या तिच्या आई होण्याचा आनंद घेत आहे. पण तिच्या या आनंदात काही अडचणी येत आहेत. याच संदर्भात तिने सोशल मीडियावर एका आई म्हणून तिच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत त्याबद्दल लिहीलं आहे. तिने सांगितले की तिला गेल्या दोन वर्षांपासून ती व्यवस्थित झोपू शकलेली नाही. सोमवारी दिशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "मला व्यवस्थित झोपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे! विना अडचण आठ नऊ तासाची झोप कशी असते हे आता आठवतही नाही असं ही तिने लिहीले आहे. सकाळी मुलाच्या रडण्याच्या आवाजाशिवाय उठणेही विसरून गेले आहे. उफ्फ! आता फक्त त्या दिवसाची वाट बघत आहे की तो दिवस कधी परत येईल... लवकरच येईल अशी आशा आहे!"
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याशिवाय दिशाने एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. त्यात ती तिच्या मुलीला हातात घेतलेली दिसत आहे. तिने त्या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे, 'आताचं लाईफ असंच चालू आहे'. अभिनेत्री नेहमीच तिच्या मुलीसोबतचे गोंडस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या आई बनण्याच्या सुंदर क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. दिशा परमारने 16 जुलै 2021 रोजी राहुल वैद्यसोबत लग्न केले होते. तिने सप्टेंबर 2023 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिली. ही आनंदाची बातमी दोघांनी मिळून चाहत्यांसोबत शेअर केली होती.
दोघांनी पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही खूप आनंदी आहोत की आमच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे! आई आणि बाळ दोघेही अगदी ठीक आणि निरोगी आहेत. आम्ही आमच्या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी सुरुवातीपासून ते प्रसूतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्हाला साथ दिली. आम्ही खूप आनंदी आहोत! आमच्या बाळाला आपले आशीर्वाद द्या." असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दिशा परमारला खरी ओळख 'प्यार का दर्द है मीठा-मीठा प्यारा-प्यारा' या टीव्ही शोमध्ये नकुल मेहतासोबत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मिळाली होती. या शोमधील तिच्या अभिनयाला लोकांची खूप पसंत केलं होतं. यानंतर ती 'वो अपना सा' मध्ये दिसली. तिने 'बड़े अच्छे लगते हैं सीझन 2' मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली, तिची ती भूमीका ही प्रेक्षकांना खूप आवडली होती. तिच्या मुलीसाठी ती सध्या जास्तीत जास्त वेळ देत आहेत.