Divya Bharti : दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य 30 वर्षांनंतर उघड, सहकलाकारानं सोडलं मौन

Divya Bharti Death Reason : 1993 साली त्या काळातील आघाडीची अभिनेत्री दिव्या भारतीचा  दिव्या भारतीचा एका दुःखद अपघातात मृत्यू झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
Divya Bharti Death : दिव्या भारतीच्या मृत्यूचं रहस्य अखेर उघड झालं आहे,
मुंबई:

Divya Bharti Death Reason : चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाच्या बहुप्रतिक्षित मल्टी-स्टारर सिनेमा 'हाउसफुल 5' ने रिलीजच्या चार दिवसांच्या आत 104.98 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो दोन वेगवेगळ्या व्हर्जन्समध्ये – 'हाउसफुल 5A' आणि 'हाउसफुल 5B' मध्ये रिलीज झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दोन वेगवेगळ्या क्लायमॅक्ससह साजिद नाडियाडवालांच्या मास्टरस्ट्रोकने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यात मोठी भूमिका बजावली आहे.  साजिद त्याच्या यशस्वी चित्रपटासाठी चर्चेत आहेत. निर्माता साजिद नाडियावाला हा दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचा नवरा आहे. दिव्याच्या अपघाती मृत्यूनंतर काही जणांनी त्याच्यावरही संशय व्यक्त केला होता. 

Advertisement

1993 साली त्या काळातील आघाडीची अभिनेत्री दिव्या भारतीचा  दिव्या भारतीचा एका दुःखद अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर या अपघातानंतर दिव्याचा नवरा साजिद नाडियावालावर संशय व्यक्त करण्यात येत होता. या घटनेनंतर तब्बल 3 दशकांनी दिव्या भारतीच्या सहकलाकारानं या विषयावरील मौन सोडलं आहे.

Advertisement

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
 

या अभिनेत्रीने केला खुलासा

दिव्याची सहकलाकारा आणि मैत्रीण गुड्डी मारुतीनं एका मुलाखतीमध्ये या विषयावर महत्त्वाची माहिती दिली आहे. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुड्डीनं सांगितलं की, दिव्याच्या मृत्यूच्या बातमीने तिचा नवरा साजिद नाडियावाला धक्का बसला. तो त्यावेळी शहराबाहेर होता. 

Advertisement

नीता लुल्लानं पाहिलं होतं

गुड्डीनं सांगितलं की दिव्याचा मृत्यू खरंच एक दुःखद अपघात होता. डिझायनर नीता लुल्लाने हा अपघात पाहिला होता. दिव्या तिच्या पतीचे वाहन तपासण्यासाठी कशा झुकल्या आणि खाली पडल्या हे सांगताना गुड्डी म्हणाल्या, 'हे घडले त्यावेळी साजिद घरी नव्हते. तो तिच्या मृत्यूनंतर खचला होता. तो एका प्रवासानंतर शहरात आला होता आणि ही बातमी त्याच्यासाठी असह्य होती. नीता लुल्ला तिथे होत्या आणि त्यांनी सर्वकाही घडताना पाहिले. दिव्या पडल्या तेव्हा त्या तिथे उपस्थित होत्या आणि त्या खात्री देऊ शकतात की तो एक अपघात होता. दिव्या तिचा नवरा साजिदची कार तपासत होती. त्यासाठी ती खाली झुकली. त्याचवेळी तो अपघात झाला.  
 

Topics mentioned in this article