Dog Lovers च्या मनाला भिडणारा चित्रपट, प्रत्येक सीनला कोसळेल रडू, केलीय बजेटच्या 7 पट कमाई

हा कन्नड चित्रपट केवळ 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

सध्या देशात कुत्र्यांच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉग लव्हर्सची झोप उडाली आहे. प्राण्यांमध्ये जर माणूस कोणाच्या सर्वात जवळ असेल तर तो म्हणजे कुत्रा हा प्राणी आहे. आपल्या देशात कुत्रे पाळणे हे आता एक फॅशन बनले आहे. असो, या ज्वलंत मुद्दा बाजूला ठेवून आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलूया जो तुम्हाला रडायला भाग पाडेल. दक्षिण भारतीय सिनेमाने नेहमीच आपल्या उत्तम कंटेंटने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. असाच एक चित्रपट आता आला आहे. ज्यात माणूस आणि कुत्र्याचे निस्वार्थ प्रेम असे काही दाखवले आहे की, तुम्हाला ही तुमचे आश्रू रोखता येणार नाहीत. 

नक्की वाचा - Dasavatar: मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर

हा चित्रपट तुम्हाला खूप रडवेल

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. IMDb वर याला 10 पैकी 8 पेक्षा जास्त रेटिंग मिळाली होती. या चित्रपटाचे नाव आहे ‘777 चार्ली'. हा कन्नड चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. रक्षित शेट्टीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने धर्मा नावाच्या व्यक्तीची भूमिका केली होती. जो आपल्याच जगात जगतो. कोणाशीही बोलत नाही. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात एका कुत्र्याची एंट्री होते. इथून त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. सुरुवातीला लोकांनी या चित्रपटाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यानंतर मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. चित्रपट सुपर डुपर हीट झाला. 

नक्की वाचा - Top 10 movies: जुलै महिन्यातील टॉप 10 चित्रपटांची यादी आली समोर, 'सैयारा' कितव्या क्रमांकावर?

बजेटच्या 7 पट जास्त कमाई

‘777 चार्ली' हा कन्नड चित्रपट केवळ 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.  या चित्रपटाने आपल्या बजेटच्या जवळपास 7 पट कमाई केली. म्हणजेच जवळपास 102.75 कोटी रुपये कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची कथा माणूस आणि प्राणी यांच्यातील भावनिक नात्यावर आधारलेली आहे. तो इतका वास्तव वाटतो की  आज तो प्रत्येक डॉग लव्हरचा आवडता चित्रपट बनला आहे. ‘777 चार्ली' हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत येतो. सध्या कुत्र्यांवरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे डॉग लव्हर्स आणि त्यांना विरोध करणारे असे आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची पुन्हा चर्चा होत आहे. 

Topics mentioned in this article