Emraan Hashmi Wife Photos: 'सिरीयल किसर'ची बायको दिसते फारच सुंदर, हे फोटो पाहिल्यावर कळेल का जडलाय तिच्यावर जीव

Emraan Hashmi wife photos : इम्रानची 'सिरीअल किसर' अशी ओळख निर्माण झाली होती, आणि त्याची ही ओळखच त्याच्यासाठी डोकेदुखी बनली होती.  

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

एक काळ होता जेव्हा इम्रान हाश्मी याने बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. इम्रान हाश्मी आणि हॉट किसींग सीन हे समीकरण तेव्हा घट्ट झालं होतं.  त्याला सिरीअल किसर म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं होतं. मात्र त्याची ही ओळखच त्याच्यासाठी डोकेदुखी बनली होती.  इम्रान हाश्मी आणि त्याची बायको परवीन शाहानी (Emraan Hashmi Wife)  हे दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. 14 डिसेंबर 2006 रोजी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परवीन शाहानी ही पेशाने शिक्षिका असून तो लाइमलाइटपासून स्वत:ला दूर ठेवणंच पसंत करते. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अयान आहे. 

1) इम्रान हाश्मी हा एक बॉलीवूड अभिनेता असून त्याला सिरीअल किसर म्हणून ओळखलं जातं.  

Photo Credit: Emraan Hashmi FB

2) इम्रानचं पूर्ण नाव सैय्यद इम्रान अन्वर हाश्मी असून 24 मार्च 1979 रोजी त्याचा मुंबईत जन्म झाला होता.

Photo Credit: Emraan Hashmi FB

3) निर्माता-दिग्दर्शक महेश आणि मुकेश भट्ट हे त्याचे मामा असून त्यांनीच इम्रानला चित्रपटसृष्टीत आणले होते. 

Photo Credit: Emraan Hashmi FB

4) 2003 साली इम्रानचा 'फुटपाथ' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र 2004 साली प्रसिद्ध झालेल्या 'मर्डर' चित्रपटामुळे तो प्रकाशझोतात आला होता. 

Advertisement

Photo Credit: Emraan Hashmi FB

5) इम्रानच्या चित्रपटातील हॉट किसिंग सीन हा अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. 

Photo Credit: Emraan Hashmi FB

6) इम्रानने गेल्या काही वर्षात आपला मोर्चा ओटीटी आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांकडे वळवला आहे. 2023 साली त्याचा 'सेल्फी' आणि 'डिबूक' चित्रपट प्रदर्शित झाला होता. डिबूक हा हॉरर थ्रिलर चित्रपट होता. 

Advertisement

Photo Credit: Emraan Hashmi FB

7) इम्रानचं परवीन शाहानीशी लग्न झालं असून या दोघांना अयान नावाचा मुलगा आहे. अयानला लहानपणीच कॅन्सरने ग्रासले होते, मात्र आता तो  बरा झाला आहे.  

Advertisement

Photo Credit: Emraan Hashmi FB

8) इम्रानच्या पहिल्या चित्रपटाचे शूटींग सुरू असताना त्याची परवीनशी ओळख झाली होती. 

Photo Credit: Emraan Hashmi FB

9) तेव्हापासून परवीन आणि इम्रान एकत्र असून 2006 साली त्यांनी लग्न केले होते. 

Photo Credit: Emraan Hashmi FB

10) 'सिरीअल किसर'ची प्रतिमा निर्माण झाल्याने परवीनच्या घरच्यांना, 'या अशा' मुलासोबत आपल्या मुलीचे लग्न कसे लावून द्यायचे? असा प्रश्न पडला होता. इम्राननेच ही गोष्ट सांगितली आहे. 

Photo Credit: Emraan Hashmi FB