8 दिवसांचे शूटिंग, 49 लाख बजेट, 20,000 कोटींची कमाई! 'या' चित्रपटाने इतिहास घडवला, पण...

अजून हा चित्रपट पाहिला नसेल, तर या वीकेंडला तुम्ही तो तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins

तुम्ही बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये अनेक भयपट (horror films) पाहिले असतील. काही चित्रपट तर असे बनले आहेत की ते आजही एकट्याने पाहताना मोठ्या मोठ्या लोकांच्याही अंगाचा थरकाप उडतो.  आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाचे नाव आहे ‘द ब्लेअर विच प्रोजेक्ट', जो 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक अमेरिकन भयपट आहे. ज्याचे दिग्दर्शन डॅनियल मायरिक आणि एडुआर्डो सांचेज यांनी केले आहे.

नक्की वाचा - Dog Lovers च्या मनाला भिडणारा चित्रपट, प्रत्येक सीनला कोसळेल रडू, केलीय बजेटच्या 7 पट कमाई

हा चित्रपट पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीवर आधारित चित्रपट (Movie on Paranormal Activity) आहे.  ‘द ब्लेअर विच प्रोजेक्ट' हा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीवर बनलेल्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट तीन तरुणांची कथा आहे. जे एका प्रोजेक्टसाठी जातात. त्यानंतर रहस्यमय पद्धतीने बेपत्ता होतात. एक वर्षानंतर जेव्हा या विद्यार्थ्यांचा कॅमेरा मिळतो, तेव्हा त्या फुटेजमधून त्यांच्यासोबत काय घडले होते हे समोर येते. या चित्रपटात हीदर डोनाह्यू, मायकल विल्यम्स आणि जोशुआ लिओनार्ड यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

नक्की वाचा - Dasavatar: मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर

‘द ब्लेअर विच प्रोजेक्ट' चे बजेट आणि कमाई (The Blair Witch Project Budget and Collection)
जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  केवळ 49 लाख रुपयांच्या कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात मोठे यश मिळवले. या चित्रपटातने तब्बल 20 अब्ज म्हणजेच 20,000 कोटी रुपयांची कमाई करून धुमाकूळ घातला होता. जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल, तर या वीकेंडला तुम्ही तो तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकता. ‘द ब्लेअर विच प्रोजेक्ट' हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.