दक्षिणेकडचा मेगास्टार, राज घराण्यातली अभिनेत्री: रहमान यांचं संगीत असलेलं हे मराठी गाणं पाहिलं का? VIDEO

Vijay Sethupathi Marathi Song : 'जरा जरा मन खुलवते' हे मराठी गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी या गाण्याला संगीत दिले असून, मूकपटाच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्याचा हा प्रयोग प्रेक्षकांसाठी नक्कीच सुखद धक्का आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vijay Sethupathi Marathi Song : 'गांधी टॉक्स' हा मराठी चित्रपट 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Gandhi Talks Movie Vijay Sethupathi Marathi Song : भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील अभिनेत्यांमध्ये  विजय सेतुपती हे नाव आघाडीवर आहे. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना केवळ स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर त्याने संपूर्ण भारतात आपली ओळख निर्माण केली आहे. 96 मधील हळवा प्रेमी असो, सुपर डिलक्स मधील ट्रान्सजेंडरची आव्हानात्मक भूमिका असो किंवा विक्रम वेदा मधील खतरनाक गँगस्टर, विजय सेतुपती नेहमीच नवनवीन प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. आता हाच प्रयोगशील अभिनेता एका आगळ्यावेगळ्या मूकपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही संवाद नसला तरी ए.आर. रहमान यांच्या संगीताने सजलेलं एक सुंदर मराठी गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.

कोणत मराठी गाणं रिलीज?

विजय सेतुपती त्याच्या आगामी 'गांधी टॉक्स' या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. हा एक सायलेंट मुव्ही म्हणजेच मूकपट आहे, ज्यामध्ये कलाकार शब्दांशिवाय केवळ हावभावातून कथा मांडणार आहेत. 

विशेष म्हणजे या चित्रपटातील 'जरा जरा मन खुलवते' हे मराठी गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी या गाण्याला संगीत दिले असून, मूकपटाच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्याचा हा प्रयोग प्रेक्षकांसाठी नक्कीच सुखद धक्का आहे. किशोर पांडुरंग बेलेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

(नक्की वाचा : BJP MLA : 19 वर्षांची लेक आजारी आणि भाजपा आमदाराने केलं दुसरं लग्न ! पहिल्या पत्नीच्या गंभीर आरोपामुळे खळबळ )

दिग्गज कलाकारांची फौज

या चित्रपटात विजय सेतुपतीसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता अरविंद स्वामी आणि राजघराण्यातील पार्श्वभूमी असलेली प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement

प्रियांका चोप्रा जोनास हिने देखील या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत तिची चुलत बहीण आणि चित्रपटाची निर्माती मीरा चोप्रा तसेच संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. झी स्टुडिओज, क्युरियस आणि मुव्हीमिल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चलनी नोटेवरचा गांधी आणि वास्तव

गांधी टॉक्स हा एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट चलनी नोटेवर असलेली महात्मा गांधींची प्रतिमा आणि गांधीजींनी आयुष्यभर जपलेली मूल्ये यातील फरकावर भाष्य करतो. 

Advertisement

पैशाच्या शोधात असलेल्या एका तरुणाचा संघर्ष आणि त्याचे एका चोरासोबत येणारे संबंध यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. समाजात वाढलेला भ्रष्टाचार, लोकांचा लोभीपणा आणि सामान्य माणसाला दररोज येणाऱ्या अडचणी यावर या चित्रपटातून उपरोधिकपणे प्रकाश टाकण्यात आला आहे.

रिलीजची तारीख आणि महत्त्व

हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. ही तारीख महत्त्वाची आहे कारण याच दिवशी महात्मा गांधींची पुण्यतिथी असते. ॲक्शन चित्रपटांच्या गर्दीत 'गांधी टॉक्स' हा चित्रपट केवळ शांततेच्या माध्यमातून आपली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 2023 मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये झाला होता. अशा प्रतिष्ठित महोत्सवात प्रदर्शित होणारा हा मोजक्या भारतीय मूकपटांपैकी एक ठरला आहे.

Advertisement