Girija Oak Neeli Saree trend : सोशल मीडियाच्या जगात कधी काय ट्रेंड होईल, याचा नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जर 'X' (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल केले असेल, तर तुम्हाला 'नीली साडीवाली' ही महिला नक्कीच दिसली असेल. ही महिला आहे लोकप्रिय मराठी आणि हिंदी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले. तिच्या व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर तिची जबरदस्त चर्चा सुरू आहे.
गिरिजाच्या आकर्षक लूकमुळे काही चाहत्यांनी तिची तुलना थेट अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बेलुची यांच्याशी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या गिरिजा ओकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि या ट्रेंडला सुरुवात झाली.
12 वर्षांच्या मुलासाठी भावनिक आवाहन
या 'खेळा'ला कोणतेही नियम नाहीत आणि त्यात काहीही 'अनुचित' (Improper) नाही, या गोष्टीची तिला भीती वाटते. असं गिरीजा ओकनं सांगितलं ती म्हणाली, "मला 12 वर्षांचा एक मुलगा आहे. तो सध्या सोशल मीडिया वापरत नाही, पण मोठा झाल्यावर तो नक्कीच वापरेल. हे जे मॉर्फ केलेले फोटो आहेत, ते आज-उद्या त्याला दिसू शकतात."
(नक्की वाचा : Dharmendra धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील तिसरी महिला; 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते 'ही-मॅन' )
"उद्या माझा मुलगा मोठा झाल्यावर त्याने माझा असा एक फोटो पाहिला, तर त्याला काय वाटेल, याचा विचार करून मला छान वाटत नाहीये. त्याला माहिती असेल की हा फोटो खरा नाही, AI वापरून तयार केलेला आहे. पण, तरीही जसं आता हे फोटो बघणाऱ्यांना माहिती आहे की ते खरे नाहीत, पण तरीही कुठेतरी एक प्रकारची मजा येते. या सर्वांचा विचार करून मला हे सांगावंसं वाटलं."
पोस्ट करणाऱ्यांना आणि लाईक करणाऱ्यांना विनंती
यावर फार काही करू शकत नाही हे माहित असतानाही, काहीच न करणं तिला योग्य वाटलं नाही, म्हणून तिने विनंती केली आहे. जे लोक अशा प्रकारचे फोटो एडिट करतात आणि पोस्ट करतात, त्यांनी एकदा तिच्या मुलाचा विचार करून पाहावा. जे लोक हे फोटो एडिट करत नाहीत, पण या पोस्ट बघतात किंवा लाईक करतात, त्यांना गिरिजाने जाणीव करून दिली की, "हे तुमच्यामुळे सुद्धा होत आहे. याची जाणीव तुम्हाला आहे का? हे पडताळून पाहा," अशी विनंती गिरीजानं केली आहे.
( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
ओळख मिळाल्याचा आनंद
या सर्व घडामोडींमुळे अनेक नवीन लोकांना तिच्या कामाबद्दल कळत आहे, याचा तिला खूप आनंद आहे. ती म्हणाली, "या निमित्ताने माझी चित्रपटं आणि नाटकं बघितली गेली, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नाही." तिने चाहत्यांना असंच प्रेम कायम ठेवण्याची विनंती केली आणि आपण सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात भेटूच, असं म्हणत व्हिडिओचा समारोप केला.
इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ