Girija Oak : 'आई-वडील वेगळे झाल्यावर मला वाटलं...' अभिनेत्री गिरीजा ओकने सांगितला 'तो' भयंकर अनुभव

Girija Oak Godbole : अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा आणि भावनिक खुलासा केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Girija Oak Godbole : गिरीजा ओकनं आई-वडिलांच्या घटस्फोटाचा अनुभव सांगितला आहे.
मुंबई:

Girija Oak Godbole : एका मुलाखतीनंतर सर्वांची नॅशनल क्रश बनलेली मराठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. त्या मुलाखतीनंतर गिरीजा सातत्यानं चर्चेत आहे. ती आता लवकरच 'परफेक्ट फॅमिली' (Perfect Family) नावाच्या एका वेब सीरिजमध्ये ती नेहा धुपिया, गुलशन देवैय्या, मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. ही वेब सीरिज कौटुंबिक थेरपीवर आधारित आहे. याच निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, गिरीजा ओक गोडबोलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा आणि भावनिक खुलासा केला आहे.

गिरीजा ओक गोडबोलनं तिच्या 'ब्रोकन फॅमिली' चा अनुभव एका मुलाखतीमध्ये सांगितला. तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल आणि त्याचा तिच्यावर काय परिणाम झाला, याबद्दल तिनं सर्व काही यावेळी सांगितलं.

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर काय झालं?

गिरीजा ओक गोडबोलचे वडील गिरीश ओक हे मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. आई-वडिलांच्या विभक्त होण्याबद्दल बोलताना गिरीजा म्हणाली, "मी एका 'ब्रोकन फॅमिली'मधून येते. मी लहान असतानाच ते दोघे वेगळे झाले. मी जी थेरपी घेतली, ती प्रतिबंधात्मक (Preventive) नव्हती. त्याऐवजी, माझ्यामध्ये ज्या काही लक्षणयुक्त समस्या (Symptomatic Problem) होत्या, त्यावर उपचार शोधण्यासाठी ती थेरपी होती.

( नक्की वाचा : Girija Oak: 'एका तासाचा रेट काय?' नॅशनल क्रश गिरीजा ओकला थेट प्रश्न ; 'त्या' मेसेजबाबत धक्कादायक गौप्यस्फोट )
 

या घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया म्हणून गिरीजा तिच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली. तिला वाटलं की आपल्यामध्ये काहीतरी शारीरिक बिघाड (Something wrong with me) आहे. पण डॉक्टरने सांगितले की, "तुझ्यामध्ये बिघाड आहे, पण तो शारीरिक नाही." आणि त्यानंतर तिने एका मनोचिकित्सक (Psychiatrist) कडे जाण्याचा सल्ला दिला. तिच्या पहिल्या संभाषणादरम्यान, मनोचिकित्सकने तिला एका थेरपिस्टकडे जाण्यास सांगितले. ती सांगते, "मी जेव्हा पहिल्यांदा थेरपी घेतली, तेव्हा मी फक्त 17 वर्षांची होती."

Advertisement

आई-वडिलांनी स्वतःसाठी निवड केली, पण मला अनेक प्रश्न होते'

घटस्फोटानंतर गिरीजाच्या कुटुंबातील समीकरणे कशी बदलली, हे तिने यावेळी स्पष्ट केलं. गिरीजा म्हणाली की, तिच्या आई-वडिलांनी सुद्धा तिच्या थेरपी सेशनला सोबत यायला हवं होतं. कारण ही फक्त तिच्या एकटीची समस्या नव्हती. गिरीजा म्हणाली, "जेव्हा माझ्या कुटुंबाचं नातं तुटलं, तेव्हा त्यांच्या (आई-वडील) मनातही खूप अपराधभाव (Guilt) होता. एकीकडे व्यक्ति म्हणून त्यांनी स्वतःसाठी काय करावं आणि दुसरीकडे संपूर्ण कुटुंबासाठी त्यांनी काय करावं, यामधील निवड त्यांना करायची होती. हा संघर्ष वाढला, तेव्हा त्यांच्यावर खूप अपराधभावाचं ओझं होतं. माझ्या आई-वडिलांनी स्वतःला निवडले."

( नक्की वाचा : VIDEO : 'नीली साडी' ट्रेंडवर गिरीजा ओकचं कळकळीचं आवाहन, म्हणाली, 'माझ्या 12 वर्षांच्या मुलाचा विचार करा...' )
 

पुढे गिरीजा म्हणाली, "मला खूप प्रश्न होते. मला वाटतं की मी त्या दोघांना माझ्यासोबत घेऊन जायला हवं होतं आणि आम्ही कुटुंबासोबत हे करायला हवं होतं. कारण तुम्ही जेव्हा कोणासोबत इतका वेळ घालवता, तेव्हा त्या नात्यात खूप ओझं निर्माण होतं."

Advertisement

गरज वाटेल तेव्हा थेरपिस्टची मदत घेते

गिरीजाने तिचा मुद्दा स्पष्ट करताना सांगितले, "मी माझ्या आईसोबत अनेक गोष्टी शेअर करू शकत नाही, कदाचित कारण ती मला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. जर ती माझ्यासाठी अनोळखी असती, तर कदाचित मी तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलू शकले असते."

ती पुढे सांगते, "मला जेव्हा गरज वाटेल, बोलायची इच्छा होईल, तेव्हा मी माझ्या थेरपिस्टकडे जाते. हे एक दीर्घकाळ चाललेलं नातं आहे आणि ते एकाच थेरपिस्टसोबत नाही. मी त्याच व्यक्तीकडे पुन्हा जाऊ शकले नाही, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत मी थेरपिस्ट बदलत राहिली. पण माझ्यासाठी ही एक सतत चालणारी प्रक्रिया (Ongoing Process) आहे."

Advertisement

गिरीजा ओक गोडबोलने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिने यापूर्वी आमिर खानच्या 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. सध्या ती हिंदी वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे.

Topics mentioned in this article