Blue Saree lady Viral Photo : गुलाबी साडी गाण्यावर डान्स करणाऱ्या अनेक महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. पण आता ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि एक्सवर निळी साडी नेसलेल्या एका महिलेचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल फोटोमध्ये एक महिला सोफ्यावर बसलेली दिसते. तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. या महिलेचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ही महिला आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
@newottupdates नावाच्या हँडलवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, “ही फोटो का ट्रेंड होत आहे आणि ही महिला कोण आहे?”, हा फोटो शेअर होताच काही तासांतच या पोस्टला 3.5 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1500 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. रेडिट आणि इंस्टाग्रामवरही हाच चेहरा सर्वत्र झळकू लागला. “ही अभिनेत्री आहे की मॉडेल?”, असाही प्रश्न यूजर्सने विचारला आहे.
खरंतर, व्हायरल फोटोत दिसणारी महिला दुसरी तिसरी कोणी नाही, तर मराठी आणि हिंदी सिनेमात काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले आहे. गिरीजाने 'तारें जमीन पर' आणि शोर इन द सीटी यासारख्या सिनेमांत काम केलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, गिरिजा ओकचा जन्म 17 डिसेंबर 1987 रोजी नागपूरच्या महाराष्ट्रात झाला होता. तिने वर्ष 2011 मध्ये सुहरूद गोडबोले यांच्यासोबत लग्न केलं. गिरिजा मराठी टीव्ही शोज, हिंदी वेब सिरिज आणि कन्नड सिनेमांतही झळकली आहे.