Golmaal 5: गोलमाल 5 मध्ये होणार 'या' ढासू अभिनेत्रीची एन्ट्री, पण यावेळी आहे कथेत मोठा ट्विस्ट

मुंबईत चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शूटिंगला दिमाखात सुरुवात झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' या सुपरहिट फ्रँचायझीचे नाव घेताच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर धम्माल-मस्ती आणि गोंधळाची टोळी उभी राहते. आता या मालिकेतील पाचव्या भागाची, म्हणजेच 'गोलमाल 5' ची प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळेस चित्रपटात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथेत मात्र यावेळी भलताच ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

मुंबईमध्ये 23 फेब्रुवारीपासून 'गोलमाल 5' च्या पहिल्या शेड्यूलला सुरुवात झाली आहे. साधारण महिनाभर हे चित्रीकरण चालणार असल्याचे समजते. 'जवान' आणि 'फॅमिली मॅन' सारख्या कलाकृतींमधून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या दाक्षिणात्या अभिनेत्री प्रियामणीने तिच्या भागाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जरी तिची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असली, तरी ती कथेमध्ये एक महत्त्वाचा 'ट्विस्ट' घेऊन येईल, अशी चर्चा आहे.  प्रियामणीची या चित्रपटातली एन्ट्री खास मानली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Viral News: ऐश्वर्या रायला मुलगी झाली, त्यावेळी सलमानची पहिली प्रतिक्रीया काय होती? आता होतेय Viral

अजय देवगणसह अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे ही जुनी टोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला तयार आहे. तसेच जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी आणि अश्विनी काळसेकर हे अनुभवी कलाकारही आपल्या विनोदी शैलीत परतणार आहेत. या भागात अक्षय कुमारची 'सरप्राइज एन्ट्री' होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, यामुळे कॉमेडीचा स्तर अधिक उंचावणार आहे.

नक्की वाचा - राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात ट्विस्ट, अमिताभ बच्चन यांच्या कनेक्शनने सर्वांच्या भूवया उंचावल्या

मुंबईत चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शूटिंगला दिमाखात सुरुवात झाली आहे. या भागात जुन्या कलाकारांसोबतच प्रियामणीच्या भूमिकेमुळे कथेला मोठी कलाटणी मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या अशीही चर्चा आहे की, खिलाडी अक्षय कुमार या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसू शकतो. जर असे झाले, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडेल यात शंका नाही. प्रियामणीच्या येण्याने 'गोलमाल'ची टीम अधिक फ्रेश आणि रंजक झाली आहे.प्रियामणीचा चित्रपटामधील नक्की काय रोल असेल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

नक्की वाचा - ना राजेश खन्ना ना अमिताभ बच्चन! 80 च्या दशकात सर्वात जास्त पैसे कोण घेत होतं? नाव ऐकून शॉक लागेल