गोविंदाला गोळी कशी लागली? काय घडलं होतं? गोविंदा-सुनीताच्या नात्याबाबत फिजिओथेरेपिस्टचा मोठा खुलासा

2024 मध्ये परवानाधाकर बंदुकीतून गोविंदाच्या पायाला नकळत गोळी मारली गेली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर गोविंदाने त्याच्या उपचारांसाठी फिजिओथेरेपी सुरु केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Govinda Latest News Update
मुंबई:

Govinda-Sunita Divorce Rumours Latest News :  2024 मध्ये परवानाधाकर बंदुकीतून गोविंदाच्या पायाला नकळत गोळी मारली गेली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर गोविंदाने त्याच्या उपचारांसाठी फिजिओथेरेपी सुरु केली. गोविंदावर उपचार करणाऱ्या फिजिओथेरेपिस्ट सुरभी धनवाला यांनी म्हटलंय की, ती सुनीता आहूजा यांना कधीच भेटली नाही. कारण त्या सेशनसाठी पती गोविंदासोबत कधीच आल्या नाहीत.गोविंदा यांनी नकळत त्यांच्या पायाला गोळी मारली होती.त्यावेळी मी त्यांना थेरेपी दिली होती. 

सुरभी पुढे म्हणाल्या, ते खूप मोठे व्यक्तीमत्व आहेत. मी त्यांना अपघातापूर्वी आणि त्यानंतरही भेटली आहे. ते खूप डिसिप्लिन्ड आहेत. ते सकाळी लवकर उठतात. योगा करतात आणि एक रूटीन बनवतात. ते माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. गोविंदाच्या घटस्फोटांच्या चर्चांबाबत सुरभी धनवाला म्हणाल्या, मी सुनीता आहुजा यांना कधीच भेटली नाही. त्या सेशनवेळी उपलब्ध नव्हत्या. ते खूप मजबूत आहेत आणि मला विश्वास आहे की, ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी ठीक करतील. ते दु:खात आहेत. पण त्यांची ताकद मेडिटेशनमध्ये आहे.ते तासंतास मेडिटेशन करतात.ते खूप अध्यात्मिक आहेत. त्यांना स्वत:ची लढाई कशी लढावी, हे चांगलं माहिते. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' भागात 2 बिबट्यांचा वावर, एक जेरबंद, दुसरा कुठे फिरतोय? थरकाप उडवणारा व्हिडीओ

गोळी लागल्याच्या घटनेबाबत गोविंदा काय म्हणाला?

2024 मध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर गोविंदाने गोळी लागल्याच्या घटनेची माहिती सांगण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली होती. गोविंदाने म्हटलं, असं काही झालं आहे, असा विश्वासच मला सुरुवातीला बसला नाही. ही घटना मोठी होती आणि त्यावेळी मला मोठा धक्का बसला. मी विचार करत होतो, आता काय झालं?..मी कोलकाताला एका शो ला जाण्यासाठी तयारी करत होतो. सकाळची वेळ होती. रिव्हॉल्वर खाली पडली आणि मिसफायर झालं. मला धक्का  बसला आणि मी जेव्हा खाली पाहिलं, तेव्हा माझ्या पायातून रक्तस्त्राव होत होता. 

गेल्या वर्षी अनेकदा सुनीता यांनी पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. गोविंदाने त्याच्याविरोधात एक कट असल्याचं सांगत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. एएनआयशी बोलताना गोविंदाने म्हटलं होतं की, मी याबाबत स्पष्ट बोललो. कारण जर गप्प बसलो असतो तर लोक माझ्याविषयी वेगळ्याच समस्या निर्माण करतील. 

Advertisement