बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. गोविंदासोबत ती वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असते. त्यावेळी तिनं वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. सुनीतानं एका कार्यक्रमात तिच्या स्टार नवऱ्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गोविंदाला रोमान्स करण्यासाठी वेळ नाही, असं सुनितानं सांगितलं. त्याचबरोबर आपण मुलांसह गोविंदासोबत वेगळं राहत असल्याची माहितीही तिनं दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गोविंदापासून वेगळी राहते पत्नी
एका मुलाखतीमध्ये गोविंदाच्या पत्नीनं सांगितलं की, 'आमच्याकडं दोन घरं आहेत. एक बंगला आणि एक अपार्टमेंट आहे. मी मुलांसह गोविंदापासून वेगळी फ्लॅटमध्ये राहते. गोविंदा बऱ्याचदा त्याच्या कामात व्यस्त असतो. तो रात्री उशीरा येतो. तो बाहेरच मित्रांशी उशीरापर्यंत बोलत बसतो. त्याच्याकडं रोमान्स करण्यासाठी वेळ नाही.
मी माझ्या मुलांसह राहते. गोविंदा खूप बोलतो. जास्त बडबड करणे म्हणजे स्वत:ची शक्ती वाया घालवणं आहे. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या माणसांवर कधीही विश्वास ठेवू नये, असं तिनं सांगितलं. मला लग्नानंतर सुरुवातीला खूप सुरक्षित वाटत होतं. पण, आता तसं वाटत नाही.'
( नक्की वाचा : जोडप्यांमध्ये वेगानं लोकप्रिय होत असलेला Sleep Divorce काय आहे? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो? )
पुढच्या जन्मी असा पती नको
सुनीतानं पुढं सांगितलं की, 'मला माझ्या नवऱ्यासोबत पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे. सुट्टीवर जायचं आहे. एका सामान्य पत्नीसारखं फिरायचं आहे. पण, त्याच्याकडं वेळ नाही. आम्ही यापूर्वी कोणता सिनेमा एकत्र पाहिला हेच मला आठवत नाही.
मला पुढच्या जन्मात असा नवरा नको. आमच्या लग्नाला 37 वर्ष झाली आहे. आता कुठं जाणार? तिथं जाऊन तरी काय करणार? तो आता 60 वर्षांचा झाला आहे. तो आता रिकामा असतो आणि काय करेन हे माहिती नाही,' असं सुनीता म्हणाली.