Jennifer Lopez: जेनिफर लोपेझचा कातिल परफॉर्मन्स; पण ड्रेस पाहून मुलांचे डोळे झाकण्याची वेळ

Hollywood actor and singer Jennifer Lopez In India: उदयपूर इथे पार पडलेल्या लग्नसमारंभाला लग्नाला जगप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ हिला आमंत्रित करण्यात आलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राजस्थानातील उदयपूर इथे अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योगपती राजू रामलिंगा मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना आणि वासमी गडीराजू यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. ( Netra Mantena and Vamsi Gadiraju Wedding) या लग्नाला जगप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ हिला आमंत्रित करण्यात आलं होतं (Hollywood actor and singer Jennifer Lopez attends the wedding ceremony). 22 नोव्हेंबर रोजी जेनिफर लोपेझ भारतात दाखल झाली होती. रविवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला  तिच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. जेनिफरने आपल्या परफॉर्मन्सने या कार्यक्रमात रंगत आणली. एखाद्या म्युझिक कॉन्सर्टप्रमाणे हा कार्यक्रम वाटत होते. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. वेटिंग फॉर टुनाइट, गेट ऑन द फ्लोर, प्ले, सेव्ह मी टुनाइट, गेट राइट, ऐन्ट योर मामा यासारख्या गाण्यांवर जेनिफर लोपेझ थिरकताना दिसली. या कार्यक्रमात जेनिफर लोपेझ प्रचंड सुंदर दिसत होती. मात्र तिने घातलेला ड्रेस पाहून लहान मुलांचे डोळे झाकण्याची वेळ आली होती. 

नक्की वाचा: 46 व्या वर्षीही अविवाहित; लग्नाचा विषय मुक्ताने दोन शब्दातच संपवला, पुन्हा कुणी विचारणारच नाही!

जेनिफर लोपेझच्या कपड्यांची चर्चा

जेनिफर लोपेझ हिने कार्यक्रमात घातलेल्या कपड्यांची बरीच चर्चा सुरू आहे. तिचे कपडे हे अत्यंत बोल्ड होते. बॉडीसूट आणि जॅकेटसह तिने कटआऊट ड्रेस आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट घातले होते. तिचा सोनेरी रंगाचा बॉडीसूट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याबद्दल बोलण्यास सुरूवात केली आहे. काहींना तो फारच मादक वाटला, काहींना अश्लील वाटला तर काहींनी तो छान असल्याचं म्हटलंय. 

56 वर्षांची वाटतच नाही! जेनिफरचा परफॉर्मन्स पाहून अनेकजण अवाक

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकाने म्हटलंय की ही 56 वर्षांची वाटतच नाही. दुसऱ्या एकाने म्हटलंय की जेनिफरने बॉडी गोल्स सेट केलेत. तिसऱ्या एका ने म्हटलंय की शानदार! या वयातही जेनिफर कमाल दिसतेय. अन्य एकाने म्हटलंय की जेनिफरने तिच्या आऊटफीटवर काम करणं गरजेचं आहे. अन्य एकाने म्हटलंय की या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तिचा ड्रेस कोड योग्य वाटत नाही.

Advertisement

लग्नासाठी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजची निवड

लग्न समारंभासाठी मात्र जेनिफरने भारतीय परंपरेशी जवळ जाणारे कपडे निवडण्याचा प्रयत्न केला होता. तिने अक अत्यंत सुंदर साडी परिधान केली होती आणि स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता. तिच्या गळ्यामध्ये अत्यंत उंची नेकलेस दिसत होता आणि कानातलेही खूप महागडे होते. लग्न समारंभ आणि कार्यक्रम आटोपून जेनिफर मायदेशी परतली आहे.  

Advertisement

नक्की वाचा: संजय दत्त सेटवर हात पकडायचा, मिठी मारायचा..Big Boss मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने केली पोलखोल

Topics mentioned in this article