हॉलीवुडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी कियानू रीव्स हा एक आहे. त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि ॲक्शन सीक्वेन्ससाठी तो नेहमीच चर्चेत असतो. ऐवढेच नाही तर तो त्याच्या संपत्तीसाठी आणि दानशूर वृत्तीसाठी ही फेमस आहे. कियानू रीव्सच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, 'द मॅट्रिक्स' आणि 'जॉन विक' ही चित्रपट लगेचच समोर येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, कियानू रीव्सने 'मॅट्रिक्स'च्या दोन चित्रपटांमध्ये किती शब्द बोलले होते? आणि जेव्हा त्याच्या मानधनाची तुलना या शब्दांशी करण्यात आली होती. तेव्हा तो जगातील असा अभिनेता ठरला, ज्याच्या एका शब्दाची किंमत लाखोंमध्ये होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कियानू रीव्सने 'द मॅट्रिक्स' (1999) आणि त्याची सिक्वेल 'द मॅट्रिक्स रीलोडेड' आणि 'द मॅट्रिक्स रिव्होल्युशन्स'मध्ये निओची भूमिका साकारली होती. या चित्रपटांमध्ये त्याचे संवाद कमी होते. पण त्याचा अभिनय आणि ॲक्शन जबरदस्त होती. रिपोर्ट्सनुसार, 'द मॅट्रिक्स रीलोडेड' आणि 'द मॅट्रिक्स रिव्होल्युशन्स'साठी त्याला जवळपास 100 मिलियन डॉलर्स मिळाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन चित्रपटांमध्ये त्याने फक्त 638 शब्द बोलले होते. या हिशोबाने एका शब्दासाठी त्याने 1,59,000 डॉलर्स म्हणजेच त्यावेळच्या डॉलरच्या किमतीनुसार जवळपास 75 लाख रुपये घेतले होते.
कियानू रीव्सच्या कमाईचा मोठा हिस्सा त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसशी ही जोडला गेला आहे. 'द मॅट्रिक्स' ट्रायोलॉजीने जगभरात 1.6 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. यातून कियानूला केवळ निश्चित मानधनच ननागी, तर प्रॉफिट शेअरिंगच्या माध्यमातूनही मोठा बोनस मिळाला आहे. कियानू केवळ त्याच्या कमाईसाठीच नाही, तर त्याच्या दानशूर वृत्तीसाठीही प्रसिद्ध आहे. त्याने 'द मॅट्रिक्स'च्या कमाईचा मोठा हिस्सा चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्स आणि कॉस्ट्यूम टीमसोबत वाटला होता. त्यासाठी त्याचे कौतूक झाले होते.
कियानू रीव्सच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, 'जॉन विक 5' हे नाव घेतलं जात आहे. याशिवाय 6 जून रोजी रिलीज होणाऱ्या 'बॅलेरिना' या चित्रपटातही त्याची झलक पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त 'गुड फॉर्च्यून' आणि 'द एंटरटेनमेंट सिस्टम इज डाउन' हे चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. कियानू रीव्स हा जितका महागडा अभिनेता आहे तितकाच मोठा दानशूर व्यक्ती म्हणूनही तो ओळखला जातो. त्यामुळे त्याचा हॉलिवूडमध्ये मोठा सन्मान केला जातो.