IC 814 Hijack : प्रवाशांसोबत अंताक्षरी ते दहशतवाद्याकडून माफी, अनुभव सिन्हाच्या वेब सीरिजमध्ये काय आहे?

IC 814 The Kandahar Hijack : कंदहार विमान अपहरणातील थरारावर नवी वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अनुभव सिन्हा या वेब सीरिजचा दिग्दर्शक आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
I
मुंबई:

डिसेंबर 1999 मधील शेवटच्या आठवड्यात सारं जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत होतं. त्यावेळी संपूर्ण देशात तणावाचं वातावरण होतं. काठमांडूहून नवी दिल्लीला येणाऱ्या IC 814 या इंडियन एक्स्प्रेसच्या विमानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं. दहशतवाद्यांनी हे विमान थेट तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदहारमध्ये नेलं. त्या विमानामध्ये 185 प्रवासी होती. त्यांचा जीव वाचवण्यासाठी भारत सरकारला तुरुंगात बंद असलेले तीन कट्टर दहशतवादी सोडावे लागले.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतानं सोडलेल्या तीन अतिरेक्यांमध्ये मसूद अझरचाही समावेश होता. त्यानंतरच्या काळात मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह अनेक भारतविरोधी घटनांमध्ये त्याचा समावेश होता. हरकत उल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 5 अतिरेक्यांनी या विमानाचं अपहरण केलं होतं. विमान अपहरणाचा हा इतिहास सर्व भारतीयांच्या मनात ताजा आहे.

नव्या वेब सीरिजमध्ये काय आहे?

मुल्क, भीड, आर्टिकल 15,  Ra1 या प्रमुख हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शक अनुभव सिन्हा याच विमान अपहरणाच्या विषयावर  वेब सीरिज घेऊन येत आहे. IC 814 The Kandahar Hijack या नावानं ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'फ्लाईट इन्टू फियर' या पुस्तकावर ही वेब सीरिज अधारित आहे. त्या विमानाचा कॅप्टन देवी शरण आणि सृंजॉय चौधरी हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार अनुभव सिन्हाला या वेब सीरिजची पटकथा आवडली नव्हती. त्यानंतर त्यांनी या विमान अपहरण 360 डिग्री अँगलनं सादर करण्याचा निर्णय घेतला. अनुभव सिन्हा, चित्रपट लेखक त्रिशांत श्रीवास्तव आणि पत्रकार एड्रिअन लेवी यांनी एकत्रित या वेब सीरिजसाठी रिसर्च केला आहे. 

( नक्की वाचा : 'मिठी मारली, चुंबन घेतलं'... मल्याळम अभिनेत्रीनं सांगितला लैंगिक छळाचा अनुभव, दिग्गजांवर केले आरोप )

प्रवाशांसोबत अंताक्षरी, फोन नंबरची देवाण-घेवाण

अनुभव सिन्हानं केलेल्या दाव्यानुसार, विमानामध्ये दहशतवादी आणि प्रवाशांनी एकमेकांसोबत अंताक्षरी केली. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. परस्परांशी फोन नंबर शेअर केले. इतकच नाही तर कॅप्टन देवी शरण यांना जखमी केलेल्या दहशतवाद्यानं त्यांची माफी देखील मागितली. दहशतवाद्यानं देवी शरण यांना मिठी मारुन त्यांची माफी मागितली. मी तुमची काही मदत करु शकतो का?' असंही या दहशतवाद्यानं देवी शरण यांना विचारलं होतं, असा दावा अनुभव सिन्हानं केला आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलंय.

Advertisement

कंदहार अपहरणावर आधारित असलेली ही वेब सीरिज 29 ऑगस्ट 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये विजय वर्मा, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा आणि अरविंद स्वामी यांची भूमिका आहे. 

( वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )

इंडियन एक्स्प्रेसच्या IC 814 विमानाचं अपहरण करणाऱ्या या दहशतवाद्यांनी रुपिन कत्याल या विमानातील प्रवाशांची हत्या केली. रुपिन त्याची पत्नीसोबत हनीमूनसाठी काठमांडूला गेला होता. त्याच्या हत्येनंतर विमानात अडकलेल्या अन्य नातेवाईंकांनी देशभर निदर्शनं केली. त्यानंतर दहशतवाद्यांशी झालेल्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भारत सरकारला 3 दहशतवाद्यांना सोडावं लागलं. तत्कालीन संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांच्यासह विशेष विमानानं हे दहशतवादी कंदहारला गेले आणि तिथं त्यांना अपहरण करण्यात आलेल्या प्रवाशांच्या बदल्यात सोडण्यात आलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article