Dhurandhar दिग्दर्शकाचं 'धुरंधर' घर! यामी गौतमसोबत आदित्य धरचं मुंबईतील 20 कोटींचं घर पाहिलंत का? पाहा Photos

Yami Gautam and Aditya Dhar’s Mumbai Home: बॉलीवूडमधील  लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाणारी यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्यांच्या सुंदर घरामुळेही चर्चेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Yami Gautam and Aditya Dhar : यामी आणि आदित्यने अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे
मुंबई:

Yami Gautam and Aditya Dhar's Mumbai Home: बॉलीवूडमधील  लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाणारी यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्यांच्या सुंदर घरामुळेही चर्चेत आहेत. 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 4 जून 2021 रोजी त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. मे 2024 मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या वेदाविदचे आगमन झाले असून सध्या हे कुटुंब मुंबईतील वांद्रे सारख्या उच्चभ्रू परिसरात एका प्रशस्त अपार्टमेंटमध्ये राहते.

किती आहे घराची किंमत?

हौसिव्हिटीच्या अहवालानुसार, यामी आणि आदित्यच्या या घराची किंमत साधारणपणे 15 कोटी ते 20 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, या घराची खरी ओळख त्याची किंमत नसून त्यातील साधेपणा आणि घराला दिलेला शोभिवंत लूक ही आहे. यामी आणि आदित्यने अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे, ज्यातून त्यांच्या घराची प्रसन्नता दिसून येते.

निसर्गाच्या सानिध्यात सजलेले घर

या घराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शांत वातावरण आणि निसर्गावर असलेले प्रेम. आदित्य आणि यामीने आपल्या घरात लाकडी फर्निचर आणि नैसर्गिक रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. घरातील प्रकाशयोजनाही अतिशय सौम्य ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण घराला एक उबदारपणा मिळतो. घराच्या खिडक्या आणि बाल्कनीतून आजूबाजूला असलेली हिरवळ घराच्या सौंदर्यात अधिकच भर घालते.

Advertisement

घरातील बाल्कनीमध्ये अनेक छोटी रोपे लावण्यात आली असून विश्रांती घेण्यासाठी ही जागा या जोडीची आवडती आहे. विशेषतः यामीने आपल्या आवडीनुसार तिचे ड्रेसिंग रूम कस्टमाईज करून घेतले आहे, जे कोणत्याही महिलेसाठी एक स्वप्नवत डिझाइन असू शकते.

Advertisement

कसे आहे घराचं डिझाइन?

वांद्रे येथील हे घर मुंबईतील अशा भागात आहे जिथे कनेक्टिव्हिटी आणि सुविधा उत्तम आहेत. मात्र, घराच्या आत प्रवेश केल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भपका जाणवणार नाही. या घराची मांडणी 'मिनिमलिझम' म्हणजे कमीत कमी पण दर्जेदार वस्तूंवर आधारित आहे. घरामध्ये मोकळी जागा भरपूर ठेवण्यात आली असून ही जागा शांतता आणि सुखाचा अनुभव देते. कोणत्याही गडद सजावटीपेक्षा आरामदायी आणि साधेपणाला त्यांनी प्राधान्य दिले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : 'धुरंधर' सोशल मीडियावर अचानक गाजायला का लागला ? ट्रेंडमध्ये आलाय Ranveer Singh चा चित्रपट, पाहा VIDEO )

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आदित्य धर सध्या त्याच्या धुरंधर या सिनेमाच्या यशाचा आनंद घेत आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे धुरंधर 2 हा सिनेमा 19 मार्च 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, यामी गौतम नुकतीच नेटफ्लिक्सवरील हक या सिनेमात इमरान हाश्मीसोबत दिसली होती.

Topics mentioned in this article