Jui Gadkari : 'ठरलं तर मग'च्या सायलीला ऐन दिवाळीत झाला 'हा' गंभीर आजार, शेअर केली भावुक पोस्ट

Jui Gadkari Update : लाखो चाहत्यांची लाडकी जुई ऐन दिवाळीमध्ये मोठ्या आजाराशी लढा देत होती!

जाहिरात
Read Time: 2 mins
Jui Gadkari Update : जुईनं सोशल मीडियावर पोस्ट करत हा अनुभव सांगितला आहे.
मुंबई:

Jui Gadkari Update : मराठी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही नेहमीच मालिका, जाहिरात तसंच सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट असते.  सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेतील तिची 'सायली' (Sayali) ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. पण या धावपळीत जुईला अनेकदा आजारपणाचा सामना करावा लागतो. यंदाच्या दिवाळीतही तिच्यासोबत असंच काहीसं घडलं. लाखो चाहत्यांची लाडकी जुई ऐन दिवाळीमध्ये मोठ्या आजाराशी लढा देत होती! तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून हा अनुभव सांगितला आणि जुईला झालेला टायफॉइड (Typhoid) ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

जुईला काय झालं होतं?

जुई गडकरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. यंदाची दिवाळी तिने कशी अनुभवली, हे सांगणारी एक खास पोस्ट तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली. 

काही खास क्षणांचे फोटो शेअर करत जुईने लिहिलं, "या वर्षीची दिवाळी टायफॉइड रिटर्नवाली... survived" जुईच्या या कॅप्शनने तिच्या चाहत्यांच्या मनात चिंता निर्माण केली. तिने पुढे दिवाळीतील काही सुंदर क्षणांचे फोटो अनुक्रमे शेअर केले, ज्यातून आजारपणातही तिने कुटुंबासोबत काही क्षण साजरे केल्याचं स्पष्ट झाले आहे.

( नक्की वाचा : Rohit Arya : 'मी थोडक्यात वाचले!' 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितचं होतं भयानक षडयंत्र; मराठी अभिनेत्री हादरली )
 


अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये टायफॉइडच्या काळातले अनेक क्षण कैद आहेत. तिने पोस्ट केलेला पहिला फोटो तिचा स्वतःचा असून, तो 'पहिला दिवस टायफॉइडसोबतचा' असल्याचे तिने नमूद केले आहे. यानंतरच्या फोटोंमध्ये दाराबाहेर लावलेले आणि घरातील सुंदर कंदील, आई, बाबा, आजोबा आणि काकांसोबतचे फोटो पाहायला मिळतात. जुईने फराळ आणि काही देवांचे फोटो देखील शेअर केले आहेत.

Advertisement

या फोटोतून हे स्पष्ट होतं की, जुईला टायफॉइडसारख्या आजाराचा त्रास होत असतानाही तिने स्वतःला सावरलं आणि दिवाळीच्या उत्साहात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. जुईला टायफॉइड झाल्याचं समजल्यावर तिच्या चाहत्यांनी लगेचच कमेंट्समध्ये तिची काळजी व्यक्त केली. 
 

Topics mentioned in this article