जगभर चित्रपटाने केलाय कल्ला, 1500 कोटी बजेट; कमावला 2700 कोटींचा गल्ला

Jurassic World Rebirth: 'जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ'ने भारतीय बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jurassic World Rebirth: 1500 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केलेत.
मुंबई:

Jurassic World Rebirth: युनिव्हर्सल पिक्चर्स इंडियाच्या 'जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ'ने Jurassic World Rebirth या नव्या सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्याने अवघ्या सहा दिवसांत 2700 कोटी रुपये कमावले आहेत. 1500 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केलेत. डायनासॉरवर आधारीत चित्रपटांनी नेहमीच चांगली कामगिरी केली असून ज्युरासिक पार्क चित्रपट मालिकेतील हा चित्रपटही त्याला अपवाद नाहीये. या चित्रपटाचा भारतातही उत्तम कामगिरी केली असून त्याने कमाईच्या बाबतीत अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.

तगडी स्टारकास्ट

'जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ'ने (Jurassic World Rebirth) भारतीय बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये 49.3 कोटी रुपयांची शानदार कमाई केली. या चित्रपटात हॉलिवूडचे दिग्गज कलाकार स्कार्लेट जॉन्सन, एमी आणि एसएजी पुरस्कारांसाठी नामांकने मिळवणारी नॉमिनी जोनाथन बेली, आणि दोन वेळा ऑस्कर विजेते महेर्शाला अली मुख्य भूमिकेत आहेत.

भारतातही जबरदस्त कमाई

'जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ' (Jurassic World Rebirth)   चित्रपटाने केवळ भारताच्या बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर जगभरातही धमाकेदार कमाई केली आहे. हा चित्रपट अपेक्षांपेक्षा जास्त कमाई करत 2025 चा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड असलेला चित्रपट बनला आहे. याबाबतीत हा चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंग'च्या जवळ पोहोचला आहे.  2 जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुमारे 2763 कोटी रुपये जमा केले आहेत.

चित्रपटात काय आहे ?

'जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ'च्या बजेटबद्दल बोलायचे झाल्यास, ते 1541 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बजेटच्या दुप्पट कमाई या चित्रपटाने आतापर्यंत केली आहे.  हा एक एक थरारक सायन्स-फिक्शन थ्रिलर चित्रपट आहे.  स्कार्लेट जॉन्सन ही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे. तिच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आलेली असते. हे पथक डायनासॉरचे जीन द्रव्य (Genetic Material) मिळवण्याच्या मोहिमेवर निघालेले असते. या द्रव्यापासून मनुष्याचा जीव वाचवणाऱ्या औषधाची निर्मिती करणे शक्य असते. डायनासॉरचे जीन द्रव्य शोधण्याच्या मोहिमेवरून मानव आणि डायनासॉरचे यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.