मुंबईत घर मिळणं ही आव्हानात्मक गोष्ट समजली जाते. स्वप्नांच्या शहरात घर मिळवण्यासाठी किती कष्ट आणि तडजोडी कराव्या लागतात याबतच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांमध्येही हा विषय मांडण्यात आला आहे. मुंबईत घर मिळवणं हे फक्त सामान्यांना नाही तर सेलिब्रेटींनाही अवघड आहे. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री कल्की कोचलीननं (Kalki Koechlin) याबाबतचा एक खुलासा केला आहे. कल्कीनं एका मुलाखतीमध्ये तिला मुंबईत घर मिळवताना आलेल्या अडचणींची माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सेल्फी हवा होता पण...
कल्कीनं चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न झालं होतं. त्यांचा 2015 साली घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आलेले अनुभव सांगितले आहेत. कल्कीचा घटस्फोट झाला त्यावेळी ती अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली होती. वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून तिचा चेहरा घरोघरी पोहोचला होता. त्यानंतरही तिला भाड्यानं घर मिळवण्यास त्रास झाला. सिंगल वुमन म्हणून मुंबईत घर मिळवणं अवघड गेल्याचं कल्कीनं सांगितलं.
कल्कीनं सांगितलं की, ' मी घराबाहेर पडले त्यावेळी 'जिंदगी मिलेगी ना दोबारा', 'ये जवानी है दिवानी' हे माझे ब्लॉक ब्लास्टर सिनेमे प्रदर्शित झाले होते. मी प्रसिद्ध होते. त्यामुळे लोकांना माझ्यासोबत सेल्फी हवा होता, पण ते मला भाड्यानं घर देण्यास तयार नव्हते. मी सिंगल वूमन असणं हे याचं मुख्य कारण होतं.
( नक्की वाचा : AR रहमानच्या घटस्फोटानंतर Grey Divorce का आहे चर्चेत? त्याचं प्रमाण का वाढतंय? )
अनुराग आणि कल्की यांनी लग्नानंतर एक घर विकत घेतलं होतं. दिग्दर्शक शशांक घोष यांच्याकडून त्यांनी हे घर विकत घेतलं होतं. अनुराग आजही त्याच घरात राहतो. पण, घटस्फोटानंतर कल्कीनं ते घर सोडण्याचा निर्णय घेतला.
कल्कीचा यापूर्वी 'गोल्डफिश' हा सिनेमा आला होता. त्यामधील तिच्या कामाचं समीक्षकांनी चांगलंच कौतुक केलं होतं. आता तिचे 'हर स्टोरी' आणि 'नेसेपिया' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अनुरागशी घटस्फोट झाल्यानंतर गाय हर्शबर्गबरोबर लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे.