Kangana Ranaut On Gender Bias : अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडमध्ये आजही मुलाला प्राधान्य देण्याची मानसिकता असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे देशातील लिंगभेद (जेंडर बायस) या विषयावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. कंगनाने एका मुलाखतीदरम्यान हा गौप्यस्फोट केला आहे. तिचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकजण तिच्या मताला दुजोरा दिला आहे.
काय म्हणाली कंगना?
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने 'हॉट्टरफ्लाई' सोबतच्या संवादात ही गंभीर बाब समोर आणली. ती म्हणाल्या की, भारतात आजही अनेक सुशिक्षित आणि बाहेरून आधुनिक दिसणारे व्यावसायिक तसेच चित्रपटसृष्टीतील कुटुंबे आतून मुलालाच अधिक महत्त्व देतात.
कंगनाच्या दाव्यानुसार, मुलाला प्राधान्य देण्याची ही मानसिकता केवळ एका विशिष्ट भागापुरती किंवा वर्गापुरती मर्यादित नाही, तर ती आशियाई कुटुंबांमध्ये फार सामान्य आहे. एखाद्याच्या घरी पहिली मुलगी असेल आणि त्यानंतर दुसरी मुलगी जन्माला आली, तर अनेक लोक बाहेरून आनंद दाखवतात किंवा त्यांना फरक पडत नसल्याचे भासवतात; पण 'आतून परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते'. ही मानसिकता बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांमध्ये आणि प्रतिष्ठित कुटुंबांमध्येही दिसून येते, असा स्पष्ट दावा कंगनानं केला आहे.
Kangana said even modern looking business/bollywood families still feel the need to have a son. Do y'all think this is true in Bollywood too, like the rest of Indian society?
byu/MaalUHave inBollyBlindsNGossip
'प्रोग्रेसिव्ह' मुखवट्याआडची खरी विचारसरणी
कंगना यांच्या या वक्तव्याला शो होस्टनेही पाठिंबा दिला. जे लोक बाहेरून स्वतःला पुरोगामी (प्रोग्रेसिव्ह) दाखवतात, ते अनेकदा आपली खरी विचारसरणी उघड करत नाहीत, असे त्याने स्पष्ट केले. कंगनानं पुढे सांगितले की, पहिल्या मुलीच्या जन्मानंतर हा भेदभाव लगेच स्पष्टपणे दिसून येत नसला तरी, दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी अनेक ठिकाणी ही मानसिकता अगदी उघडपणे समोर येते. अनेकजण तोंडी 'आम्हाला फरक पडत नाही' असे म्हणत असले तरी, त्यांच्या मनात 'बेट्याची' इच्छा आजही कायम आहे.
( नक्की वाचा : Amitabh Bachchan Emotional : "आता रात्री झोप येणार नाही!"; KBC च्या स्पर्धकाचे सत्य ऐकून अमिताभ बच्चन इमोशनल )
सोशल मीडिया युजर्सचाही कंगनाला पाठिंबा
कंगना रनौत यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्सने या कटू सत्याशी सहमती दर्शवली आहे आणि स्वतःचे वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत.
एका युजरने कंगना यांना पाठिंबा देत लिहिले की, काही श्रीमंत लोक बाहेरून आधुनिक दिसत असले तरी विचारांच्या बाबतीत ते खूप मागासलेले असतात. या युजरने एका श्रीमंत जोडप्याचे उदाहरण दिले. दोन मुली झाल्यानंतर त्यांना तिसरे बाळ 'मुलगाच हवा' होता. यासाठी ते बँकॉक (Bangkok) आणि दुबईला (Dubai) उपचार घेण्यासाठी गेले होते. या उदाहरणातून 'पैशाने विचार बदलत नाहीत' हे सिद्ध होते, असे युजरचे म्हणणे आहे. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, श्रीमंत लोक स्वतःला आधुनिक दाखवतात, पण त्यांची विचारसरणी अजूनही रूढिवादी (conservative) आहे आणि अशा कुटुंबांमध्ये मुलाची (बेट्याची) अपेक्षा जास्त असते.