Kangana vs Rakhi: 'एअरपोर्टवर कानाखाली खाल्ली होती ना?' राखीने कंगनाला डिवचलं, GEN Zची बाजू घेत नको ते सुनावलं

देशातल्या मुलींना वाईट-साईट बोलण्याची तूझी लायकी आहे का असा प्रश्न ही तिने या व्हिडीओतून केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत सध्या GEN Zच्या रडारवर आहे. तिने ज्या पद्धतीने या GEN Z चा उल्लेख केला होता, त्यावर आता सर्व स्तरातून टिका होत आहे. त्यात आता या GEN Zच्या बाजूने अभिनेत्री राखी सावंत मैदानात उतरली आहे. तिने कंगनाला डिवचणारा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यातून तिने कंनाला शिव्यांची लाखोली वाहीली आहे. शिवाय GEN Z च्या चारित्र्यावर बोलणाऱ्या कंगनाला तिच्याच चारित्र्याबाबतही राखीने प्रश्न केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओला जवळपास 7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. तर लाईक आणि कमेंटचा यावर पाऊस पडला आहे. 

कंगनाने GEN Zचा उल्लेख गटार जनरेशन केला होता. शिवाय आई-वडीलांच्या जीवावर जगणारी बिघडलेली मुलं असा ही तिने त्यांचा उल्लेख केला होता. हे कमी म्हणून की काय  ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या 'स्वातंत्र्याचं' त्या अभिमानानं प्रदर्शन करणारी मुलं असा उल्लेख ही तिने केला होता. तिच्या या वक्तव्यावर सर्व स्तारातून टिका झाली. पण अभिनेत्री राखी सावंतने मात्र सर्वां पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने कंगनाला आडव्या हाताने घेतलं आहे. तिने कंगनाला नुसतं सुनावलं नाही तर तिला शिव्यांची लाखोली वाहीली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Kangana: 'ड्रग्ज घेणं, दारू पिणं, अनेकांसोबत लैंगिक संबंध, ही तर गटार जनरेशन' GEN-Z ना कंगना हे काय बोलली?

राखी आपल्या व्हिडीओत म्हणते, एअरपोर्टवर तू कानाखाली खाल्ली होतीस ना. तुला अडून मार खायचा आहे का? तू झेड दर्जाची सुरक्षा घेवून फिरतेस. हिंमत असेल तर एकटी फिरून दाखव. मग तुला समजेल देशाची आणि या तरुणांची ताकद काय आहे ते. तू पळपुटी आहेत. तू या लहान मुलांना अतिशय घाण बोलली आहेत. तु बॉलिवूडमध्ये काय दिवे लावले आहेस हे सर्वांना माहित आहे. तू आधी तुझं चारित्र बघ. तू गटारातील किड आहे अशा शब्दात राखीने कंगनाला सुनावलं आहे. देशातल्या मुलींना वाईट-साईट बोलण्याची तूझी लायकी आहे का असा प्रश्न ही तिने या व्हिडीओतून केला आहे. राखी सावंत यावरच थांबली नाही. 

नक्की वाचा - Sai Temple: शिर्डीला नाही तर 'या' गावात आहे भारतातले पहिले साई मंदिर, तुम्हाला हे गाव माहित आहे का?

तू बाहेर ये. तुला कुणी कुत्रा ही विचारणार नाही असं ही राखी म्हणाली. तू देशातल्या मुलींचा अपमान केला आहेस. तु त्यांना काही ही बोलली आहेस. तू कशी खासदार झालीस. संसदेत बसून तू या मुलांना मुलींना काही बोलत आहेस. तुला अजून फटके हवे आहेत का असं ही राखी या व्हिडीओ बोलताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तिच्या या व्हिडीओला जळपास सात मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. तर तिन लाखा पेक्षा जास्त लव्ह लाईक मिळाले आहे. त्याच सोबत 37 हजार पेक्षा जास्त कमेंट या व्हिडीओवर आले आहे. अनेकांनी तिला समर्थन दर्शवलं आहे तर कंगनावर राग व्यक्त केला आहे. 

Advertisement