Kantara: A Legend Chapter-1 Box Office Collection Day 3: दसऱ्याच्या मुहूर्तावर हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यांपैकी या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या दोन मोठ्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे: यामध्ये कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) आणि दुसरीकडे वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) चा समावेश आहे . दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत मात्र कमाईच्या बाबतीत कांतारा चॅप्टर 1 ने बाजी मारली आहे.
कांतारा चॅप्टर १ ची ऐतिहासिक कमाई:
सैकनिल्क (Sacnilk) च्या अहवालानुसार, 'कांतारा चॅप्टर १' ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व दाखवले आहे . पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ६१.८५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, दुसऱ्या दिवसाची कमाई ४३.६५ कोटी इतकी होती, ज्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाचा गल्ला १०५.५ कोटी पर्यंत पोहोचला. तिसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, या चित्रपटाने पुन्हा एकदा मुसंडी मारत ५५ कोटी रुपयांची कमाई केली. परिणामी, भारतात या चित्रपटाची एकूण कमाई १६२.८५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच, जागतिक स्तरावर (Worldwide) या चित्रपटाने २५० कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे.
दुसरीकडे, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या बॉलिवूड चित्रपटाचा मात्र संथ प्रवास सुरु झाला.. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी रुपये कमावले. मात्र, दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली आणि केवळ ५.२५ कोटी रुपये जमा झाले. तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने काहीशी सुधारणा करत ७.२५ कोटी रुपये कमावले. त्यामुळे, भारतात या चित्रपटाची तीन दिवसांतील एकूण कमाई २२ कोटी तर जागतिक स्तरावर ३५ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटात ऋषभ शेट्टीने केवळ मुख्य भूमिकाच (Lead Role) साकारली नाही, तर दिग्दर्शनाची (Direction) जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षकांचाही चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद पाहायला मिळत आहे.