Kapil Sharma's cafe attacked in Canada: कॅनडामध्ये कपिल शर्मा याच्या रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाल्याची मोठी बातमती समोर आली आहे. कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माने दोन दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये रेस्टॉरंट उघडले होते. आज या रेस्टॉरंटमध्ये जोरदार फायरिंग करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबाराची जबाबदारी दहशतवादी हरजीत सिंग (Harjeet Singh Laddi) लड्डीने घेतली आहे.
कसा, का अन् कुणी केला हल्ला?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कॅनडामधील कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. लड्डी हा भारताचा एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे (Khalistani Terrorist) आणि तो बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशनल) शी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लड्डीने कपिल शर्माच्या काही जुन्या विधानामुळे हा हल्ला केल्याचे म्हटले आहे.
कपिल शर्माच्या कोणत्या विधानामुळे हरजीत सिंग लड्डीने हल्ला केला हे अद्याप कळलेले नाही. कॅनडाचे पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. व्हिडिओमध्ये गोळ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. व्हिडिओ पाहून असेही दिसते की हा गोळीबार नियोजनानुसार करण्यात आला होता. तथापि, या गोळीबारात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
कोण आहे हरजितसिंग लढ्ढी? (Who is Harjeet Singh Laddi)
हरजीत सिंग लड्डी हा बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात आहे. एनआयएने त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित केले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की लड्डी हा दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे आणि तो बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. या विनोदी कलाकाराच्या जुन्या विधानामुळे दुखापत झाल्यानंतर त्याने गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, 8 जुलै रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कपिल-गिन्नी यांच्या 'कॅप्स कॅफे'चे उद्घाटन केले होते. हे कपिल शर्माचे पहिलेच आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट असल्याचे म्हटले जात आहे. तथापि सुरक्षा संस्था आणि मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, कपिल शर्माचे रेस्टॉरंट आणि त्याच्या जवळील इतर इमारती ज्यावर गोळीबार झाला तो दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचा आहे.