बॉलिवूडमधील 'पॉवर कपल' कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)! या दोघांच्या आयुष्यात आता एक गोड आणि आनंदाचा क्षण आलाय. नुकतीच कतरिना 42 वर्षांची असताना एका गोंडस मुलाची आई झाली आहे.
या बातमीनंतर त्यांच्यावर चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. याच आनंदात विकीचे वडील आणि कतरिनाचे सासरेबुवा, श्याम कौशल (Sham Kaushal) यांना आपली खुशी आवरवत नाहीये. 'दादा' झाल्यावर त्यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर करत स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून दिलीये.
श्याम कौशलने व्यक्त केला आनंद
विकी आणि कतरिनाने शुक्रवारी (7 नोव्हेंबर 2025) त्यांच्या मुलाचे स्वागत केले. कुटुंबातील ही आनंदाची छोटीशी 'किरण' घरी आल्यावर श्याम कौशल यांनी इन्स्टाग्रामवर एक खूप इमोशनल पोस्ट लिहिली.
( नक्की वाचा : कर्जमुक्तीचा महामंत्र! 6 वर्षांत 53 लाखांचे Home Loan फेडणाऱ्या इंजिनियरने सांगितल्या 'या' 6 खास टिप्स )
श्याम कौशल यांनी लिहिलं की,
"शुक्रिया रब दा... कालपासून देवाने माझ्या कुटुंबावर इतकी मेहरबानी केली आहे की, मी जितके आभार मानेन, तितके ते कमीच आहेत. देव खूप दयाळू आहे. देवाची ही कृपा माझ्या मुलांवर आणि कुटुंबातील सर्वात ज्युनियर कौशलवर कायम राहावी. आम्ही सगळे खूप आनंदात आहोत आणि स्वतःला भाग्यवान समजतोय."
या पोस्टच्या शेवटी, त्यांनी 'दादा' झाल्याचा आनंद व्यक्त करत लिहिलं, "दादा झाल्यानं खूप आनंद होतोय. देव सगळ्यांचे भले करो, रब रक्खा."
विकीच्या भावानेही व्यक्त केला आनंद
श्याम कौशल यांच्या आधी विकीचा छोटा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) यानेही 'चाचू' (काका) झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. त्याने विकी आणि कतरिनाच्या घोषणेची पोस्ट रीशेअर करत, "मी का झालो!" अशी छोटी पण आनंदाची कमेंट केली होती.
कतरिना आणि विकीची गोड घोषणा
कतरिना आणि विकीने शुक्रवारी एका खूपच प्रेमळ पोस्टद्वारे आपल्या मुलाच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "आमच्या आनंदाचं आगमन झालं आहे. अपार प्रेम आणि कृतज्ञतेसह, आम्ही आमच्या छोट्या पाहुण्याचं स्वागत करतोय. 7 नोव्हेंबर, 2025."
कॅप्शनमध्ये त्यांनी फक्त दोन शब्द लिहिले होते: "धन्य. ओम."