Asha Bhosle Health Update : आशा भोसले रुग्णालयात दाखल, नातीनं सांगितलं नेमकं काय झालंय!

Asha Bhosle Health Update : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले  यांना  मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Asha Bhosle Health Update : आशा भोसले यांची नात जनाई भोसलेनं महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई:

Asha Bhosle Health Update : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले  यांना  मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. ही माहिती समजताच देशभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांची नात जनाई भोसले हिने अधिकृत प्रतिक्रिया देत सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.

रुग्णालयात दाखल करण्याचे नेमके कारण काय?

आशा भोसले यांना रुग्णालयात का दाखल करावे लागले, याबाबत जनाई भोसले हिने महत्त्वाची माहिती दिली आहे. जनाईने सांगितले की, कमालीचा थकवा जाणवत असल्यामुळे आणि छातीत संसर्ग (chest infection) झाल्यामुळे आशाताईंना रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Advertisement

सध्या त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. सर्व काही लवकरच ठीक होईल आणि प्रकृतीत सुधारणा होताच आम्ही तुम्हाला त्याबद्दलची सकारात्मक माहिती देऊ, असा विश्वास जनाईने व्यक्त केला आहे.

कुटुंबाकडून गोपनीयतेची विनंती

आशा भोसले यांची प्रकृती आणि उपचारांबाबत माहिती देतानाच, भोसले कुटुंबाने सध्याच्या परिस्थितीत गोपनीयतेचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे. ही वेळ कुटुंबासाठी अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगत जनाईने चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. आशाताईंनी त्यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत केवळ हिंदीच नाही, तर मराठी, बंगाली आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर राज्य केले आहे.


लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी संगीत विश्वात स्वतःची एक वेगळी आणि अढळ ओळख निर्माण केली आहे. आपल्या खाजगी आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, दोन लग्ने केली आणि अनेक वैयक्तिक संकटांचा सामना केला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी अधिक ताकदीने स्वतःला सावरले आणि गायकीचा प्रवास सुरू ठेवला. आज वयाच्या या टप्प्यावरही त्यांची ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सध्या सोशल मीडियावर प्रार्थनांचा ओघ सुरू झाला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article