जाहिरात

OTT Web Series 2026 : 'पंचायत 5', 'हीरामंडी 2' ते 'मटका किंग', 2026 मध्ये येतायत झोप उडवणाऱ्या 'या' 8 वेबसीरिज

ववर्ष 2026 हे  फक्त चित्रपटांच्या दृष्टीनेच नव्हे तर वेब सीरिजच्या बाबतीतही सुपरहिट ठरणार आहे. यंदा मेगा बजेटच्या मोठ्या वेब सीरिज ओटीटीवर झळकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. वाचा संपूर्ण लिस्ट..

OTT Web Series 2026 : 'पंचायत 5', 'हीरामंडी 2' ते 'मटका किंग', 2026 मध्ये येतायत झोप उडवणाऱ्या 'या' 8 वेबसीरिज
Web Series To Release In 2026

New Web Series Of 2026 : नववर्ष 2026 हे  फक्त चित्रपटांच्या दृष्टीनेच नव्हे तर वेब सीरिजच्या बाबतीतही सुपरहिट ठरणार आहे. यंदा मेगा बजेटच्या मोठ्या वेब सीरिज ओटीटीवर झळकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काही वेब सीरिजचे सिक्वलही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. तर काही नवीन सीरिज थ्रिलर आणि सस्पेन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला 2026 मध्ये रिलीज होणाऱ्या ओटीटी सीरिजबद्दल माहिती देणार आहोत.या वेबसीरिजबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

या नव्या वेबसीरिज ओटीटीवर घालणार धुमाकूळ

हीरामंडी 2

संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी'ने ओटीटीवर धुमाकूळ घातला होता. सीरिज वादात सापडली असली तरी नेटफ्लिक्सच्या रँकिंगमध्ये ती टॉपमध्ये होती. आता 2026 मध्ये या सीरिजचा दुसरा भाग, ‘हीरामंडी-2'रिलीज होऊ शकतो.‘हीरामंडी-2'ची घोषणा झाली आहे.पण रिलीज डेटबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.सोनाक्षी सिन्हा आणि अदिती राव हैदरी या सीरिजमध्ये पुन्हा एकदा दिसू शकतात.

गुल्लक सीझन 5

सन 2019 मध्ये सोनी लिववर प्रदर्शित झालेली ‘गुल्लक' ही सीरिज प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. आता या सीरिजचा पाचवा सीझन याच वर्षी येऊ शकतो. या सीरिजमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या जीवनातील अडचणींपासून ते छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांविषयी सांगण्यात आले आहे. संतोष आणि शांति मिश्रा तसेच त्यांची मुलं आनंद “अन्नू” मिश्रा आणि अमन मिश्रा यांची स्टोरी देसी तडका स्टाईलने सादर करण्यात आली आहे. 

नक्की वाचा >> देशातील 1st वंदे भारत स्लीपर ट्रेन सुसाट धावणार ! ठिकाण, वेळ, दर, वेग अन् खास वैशिष्ट्ये, वाचा A To Z माहिती

पंचायत सीझन 5

2020 मध्ये ‘पंचायत' वेब सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता याच वर्षी या सीरिजचा पाचवा सीझन रिलीज होणार आहे.सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. पण रिलीज डेटबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.जितेंद्र कुमार,नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या सीरिजमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहेत.

‘तस्करी: द स्मगलर्स वेब'

इमरान हाशमी स्टारर ओटीटी सीरिज ‘तस्करी: द स्मगलर्स वेब' याच वर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या सीरिजमध्ये इमरान हाशमी कस्टम ऑफिसरची भूमिका साकारत आहेत. सीरिजमधील अभिनेत्याचा लुकही जाहीर करण्यात आला आहे. ही सीरिज तुम्ही 14 जानेवारीला नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

‘मटका किंग'

जुगाराच्या खेळातील धोके दाखवणारी ‘मटका किंग' ही सीरिजदेखील याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा आणि सई ताम्हणकर झळकणार आहेत.ही सीरिज मार्चपूर्वी रिलीज होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.परंतु, अद्यापही अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

नक्की वाचा >> कल्याण-डोंबिवलीत महायुतीनं उधळला विजयी गुलाल, आज बिनविरोध निवडून आलेले 'ते' 6 उमेदवार कोण?

‘ओ साथी रे'

इम्तियाज अली यांची वेब सीरिज ‘ओ साथी रे' याच वर्षी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अदिती राव हैदरी,अविनाश तिवारी आणि अर्जुन रामपाल यांसारखे कलाकार दिसणार आहेत. ही सीरिज याच वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

‘दलदल'

अभिनेत्री भूमी पेडणेकरची ‘दलदल' ही सीरिजदेखील ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या सीरिजमध्ये भूमी डीसीपीची भूमिका साकारत आहे. ती या सीरिजमध्ये एका मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. 

‘ऑपरेशन सफेद सागर'

‘ऑपरेशन सफेद सागर' ही सीरिजदेखील 2026 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज केली जाणार आहे. ही एक अप्रतिम वॉर ड्रामा सीरिज असेल,ज्यात समुद्रमार्गे शत्रूंशी लढताना एका सैनिकाला किती अडचणी आणि ताणतणावांना सामोरे जावे लागते,हे दाखवले जाईल. या कथेला 1999 च्या कारगिल युद्धाशी जोडले गेले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com