Interesting Story: माधुरी दीक्षितचं ते 'राज' लग्नाच्याच दिवशी उघड झालं, पती नेनेंना जेव्हा ते समजलं तेंव्हा..

17 ऑक्टोबर 1999 रोजी अमेरिकेत अत्यंत खाजगी स्वरूपात या दोघांचे लग्न झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • माधुरी दीक्षितने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने संपूर्ण देशाला वेड लावले होते
  • माधुरीचा भाऊ अजित दीक्षित यांच्या पार्टीत डॉ. श्रीराम नेने यांची माधुरी सोबत भेट झाली
  • १९९९ मध्ये अमेरिकेत खाजगीपणे माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांचा विवाह झाला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Madhuri Dixit Marriage Secrets: बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित हिने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने संपूर्ण देशाला वेड लावले होते. माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर राज्य केलं होतं. सुपस्टारमध्ये तिची गणती होत होती. लेडी अमिताभ म्हणून ही तिचा उल्लेख होता. तिची एक झलक मिळाली यासाठी तिचे चाहते दिवाने होते. ऐवढी प्रचंड लोकप्रियता माधुरी दीक्षितची होती. तिने एक काळ गाजवला हे कोणीही नाकारणार नाही. मात्र, ज्यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली, त्या डॉ. श्रीराम नेने यांना माधुरीच्या अफाट लोकप्रियतेची पुसटशी कल्पनाही नव्हती. ही राज त्यांना त्यांच्या लग्नाच्याच दिवशी समजले हे विशेष. 

अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. नेने हे कार्डियोव्हस्कुलर सर्जन आहेत. माधुरीचा भाऊ अजित दीक्षित याच्या पार्टीत दोघांची पहिली भेट झाली. या भेटीत माधुरीचे स्टारडम कुठेही आड आले नाही. एका मुलाखतीत माधुरीने सांगितले होते की, श्रीराम यांना ती भारतातील इतकी मोठी अभिनेत्री आहे हे ठाऊकच नव्हते. त्यांना ती केवळ एक सुसंस्कृत भारतीय मुलगी वाटली आणि हाच साधेपणा माधुरीला भावला. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत माधुरी मोठी स्टार आहे हे त्यांना माहितच नव्हते. 

Advertisement

नक्की वाचा - 'तबसूम फातिमा' कशी बनली सर्वांची लाडकी 'तब्बू'? वडीलांचे आडनाव का लावत नाही? वाचा रंजक किस्सा

17 ऑक्टोबर 1999 रोजी अमेरिकेत अत्यंत खाजगी स्वरूपात या दोघांचे लग्न झाले. जेव्हा भारतात ग्रँड रिसेप्शन झाले, तेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार तिथे पोहोचले. रिसेप्शनमध्ये आलेल्या गर्दीतून आणि कलाकारांच्या मांदियाळीतून डॉ. नेने यांना कळाले की, आपण ज्या मुलीशी लग्न केले आहे ती संपूर्ण भारताची लाडकी अभिनेत्री आहे. त्यांनी या लग्नात फक्त अमिताभ बच्चन यांनाच ओळखलं. त्यावरून त्यांनी आपली पत्नी किती मोठी कलाकार आहे हे त्यांना समजले. 

नक्की वाचा - Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाच्या लग्नाबाबत सस्पेन्स वाढला!, लग्नाची तारीख पुढे ढकलली की अजून काही...

अमेरिकेत साधेपणाने लग्न उरकल्यानंतर जेव्हा ही जोडी भारतात आली, तेव्हा विमानतळापासून ते रिसेप्शनपर्यंत लोकांची झालेली गर्दी पाहून नेने थक्क झाले. रिसेप्शनला जेव्हा बिग बी अमिताभ बच्चन आले, तेव्हा त्यांना ओळखल्यानंतर डॉ. नेने यांना जाणीव झाली की आपली पत्नी ही साधीसुधी मुलगी नसून करोडो हृदयांची धडधड आहे. तोपर्यंत हे राजचं होते. हे राज ते भारतात आल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या समोर आले.