Tamanna Bhatia: बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तमन्नाने वर्ष 2023मध्ये फेअरप्ले अॅपवर आयपीएलचे अवैधरित्या स्ट्रीमिंग केले होते. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटीयाला समन्स बजावले आहे. तमन्नाला 29 एप्रिलला महाराष्ट्र सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
(नक्की वाचा: 'मुंबई इंडियन्सकडून खेळलात तर डोकं फुटून जाईल', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा)
तमन्ना भाटियाला का बजावण्यात आले समन्स?
वर्ष 2023मध्ये तमन्नाने फेअरप्ले अॅपवर आयपीएलचे अवैधरित्या स्ट्रीमिंग केले होते. ज्यामुळे एका कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठीच तमन्नाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे.
संजय दत्तलाही बजावण्यात आले होते समन्स
यापूर्वी या प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला देखील 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. कारण ज्यावेळेस समन्स बजावण्यात आले, त्यावेळेस देशात नसल्याचे त्याने सांगितले होते. आपला जबाब नोंदवण्यासाठी वेळ आणि तारीख देण्याची मागणी संजयने केली होती.
(नक्की वाचा: 'KKR मध्ये घालवलेला काळ सर्वात खराब', टीम इंडियाच्या स्टारनं सांगितली 'मन की बात')
नेमके काय आहे प्रकरण?
संबंधित कंपनीच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र सायबर सेलने फेअरप्ले अॅपविरोधात एफआयआरविरोधात दाखल केला होता. अभिनेत्री तमन्ना भाटियाने फेअरप्ले अॅपचे प्रमोशन केले होते. सायबर पोलिसांना तमन्नाकडून जाणून घ्यायचे आहे की, फेअरप्ले अॅपचे प्रमोशन करण्यासाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला? किती आणि कोणी मानधन दिले? इत्यादी.
दरम्यान कंपनीने त्यांच्या तक्रारीमध्ये दावा केला आहे की, फेअरप्ले अॅपने वर्ष 2023मध्ये आयपीएलचे बेकायदेशीररित्या स्क्रीनिंग केले आणि यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला.
(नक्की वाचा: कुल धोनी कॅमेरामनवर संतापला, थेट बॉटलच उगारली; Video Viral)