Mahima Chaudhry 2nd Marriage Fact Check: महिमा चौधरीने संजय मिश्रांशी लग्न केलं?

Mahima Chaudhry 2nd Marriage Fact Check: फोटो काढत असताना महिमाने या फोटोग्राफर्सना उद्देशून म्हटले की, 'तुम्ही लग्नाला काही येऊ शकला नाही, तोंड गोड केल्याशिवाय जाऊ नका.'

जाहिरात
Read Time: 2 mins
Mahima Chaudhry: 'परदेस', 'धडकन' सारख्या चित्रपटात काम केलेल्या महिमा चौधरीने एक काळ गाजवला होता.
Mahima Chaudhry Insta
मुंबई:

Mahima Chaudhry Video: बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीचे नाव सध्या Google वर भलतेच ट्रेंड होऊ लागले आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये महिमा चौधरी नववधूसारखी नटलेली दिसत असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने दुसरं लग्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला तिनेच केलेल्या विधानामुळे  आणखी फोडणी मिळालीय. महिमा चौधरी ही 52 वर्षांची असून तिने दुसरं लग्न केल्याच्या अफवांमुळे सध्या बॉलीवूडमध्ये खळबळ उडालीय. 

नक्की वाचा: अशनूर कौरच्या अंडरआर्ममध्ये केस, अभिषेक बजाजने सर्वांसमोर उडवली खिल्ली! नेटकरी संतापले..

महिमा चौधरीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नेमके काय आहे ? 

महिमा चौधरीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तिने अभिनेते संजय मिश्रा यांच्याशी लग्न केल्याचे दिसते आहे. या दोघांनी फोटोग्राफर्सना पोजही दिल्या. फोटो काढत असताना महिमाने या फोटोग्राफर्सना उद्देशून म्हटले की, 'तुम्ही लग्नाला काही येऊ शकला नाही, तोंड गोड केल्याशिवाय जाऊ नका.' हाच व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झालाय. या चर्चेमागील तथ्य काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

महिमा चौधरीच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य

महिमा चौधरी हिने दुसरं लग्न केल्याची चर्चा ही निव्वळ अफवा आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो महिमा चौधरी हिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या प्रमोशनसाठी महिमा चौधरी नववधूसारखी नटून थटून तयार झाली होती. तिच्या नवऱ्याची भूमिका साकारणारे संजय मिश्रा हे देखील नवरदेवाच्या रुपात दिसत होते. 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' नावाचा चित्रपट येत असून त्याच्याच प्रमोशनसाठी महिमा चौधरी हिने ही वेशभूषा केली होती. हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. 

नक्की वाचा: अभिनेत्री योगिता चव्हाण-सौरभ चौघुले वेगळे होणार? लग्नाच्या वर्षभरानंतरच चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी महिमा चौधरी हिने सोशल मीडियावर 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरमध्ये वार्धक्याकडे झुकलेले संजय मिश्रा हे नवरदेवाच्या भूमिकेत दाखवण्यात आले असून त्यांच्या दुसऱ्या लग्नाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे या मोशन पोस्टमध्ये दाखवण्यात आले आहे. 

Advertisement

'परदेस' गर्ल महिमा चौधरीचे बॉलीवूड कमबॅक

परदेस, धडकन सारख्या चित्रपटात काम केलेल्या महिमा चौधरीने एक काळ गाजवला होता. नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या नादानियां चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात खूशी कपूर, सुनील शेट्टी यांच्या भूमिका होत्या.