Mahima Chaudhry Daughter: महिमा चौधरीची लेक वडिलांपासून दुरावली, पण आईच्या सावलीत बनली 'सुंदर परी' Photos

Mahima Chaudhry Daughter 8 Photos: महिमा चौधरी साल 2013 मध्ये आपल्या पतीपासून वेगळी झाली होती, त्यानंतर तिने आपल्या मुलीचा सांभाळ एकटीने केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mahima Chaudhry Daughter 8 Photos: अभिनेत्री महिमा चौधरी हिची मुलगी अरीना चौधरी आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
मुंबई:

Mahima Chaudhry Daughter 8 Photos: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिची मुलगी अरीना चौधरी आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अरीना दिसायला अगदी बाहुलीसारखी दिसते, असे म्हटले जाते. इतकेच नाही तर तिच्या केसांच्या स्टाईलचेही अनेक जण चाहते आहेत. 

अरीनाच्या सौंदर्यामुळे तिची तुलना अमेरिकन अभिनेत्री सेलेना गोमेज आणि अमूल गर्लशी केली जाते. अरीना आता सौंदर्याच्या बाबतीत तिच्या आईपेक्षा अजिबात कमी नाही आणि काही लोक तर तिला बॉलीवूडमधील सर्वात सुंदर स्टार किड देखील म्हणू लागले आहेत. चला तर मग, महिमा चौधरीची मुलगी अरीना हिचे काही सुंदर फोटो पाहूयात.

Advertisement

महिमा चौधरीची मुलगी अरीना हिचा जन्म साल 2007 मध्ये मुंबईत झाला होता. सध्या ती 18 वर्षांची आहे. तिच्या वडिलांचे नाव बॉबी मुखर्जी असून ते एक व्यावसायिक आहेत.
 

महिमा चौधरीची मुलगी अरीना हुबेहूब आपल्या आईसारखी दिसते. या माय-लेकीची जोडीला अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसली आहे. त्यावेळी अरीनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
 

महिमा चौधरीची मुलगी चित्रपट सृष्टीत काम करणार की नाही, याबद्दल तिच्या आईने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, अरीना तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकते, अशी क्षमता चाहत्यांना तिच्यामध्ये दिसते.
 

अरीना कोणत्याही कार्यक्रमात आपल्या आईसोबत असते, तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मागील अनेक कार्यक्रमांमध्ये तिने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 

Advertisement

इतर प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलांप्रमाणे अरीना देखील एक स्टार किड आहे, परंतु आतापर्यंत तिला कोणत्याही कारणावरून ट्रोल करण्यात आलेले नाही. महिमा चौधरी साल 2013 मध्ये तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली होती, त्यानंतर तिने आपल्या मुलीचा सांभाळ एकटीने केला. जेव्हा अरीना पदवीधर झाली होती, तेव्हा महिमाने लिहिले होते की, तुला पदवीधर होताना पाहून मला अभिमान वाटतो. अभिनंदन, माझ्या लाडक्या मुली.
 

महिमा चौधरीची मुलगी आधुनिक असण्यासोबतच खूप संस्कारी देखील आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिने अभिनेते राज बब्बर यांच्या पाया पडून त्यांचा आदर केला होता, ज्यामुळे तिचे खूप कौतुक झाले.
 

Advertisement

मीडिया इव्हेंट्समध्ये महिमा चौधरीची मुलगी नेहमीच आत्मविश्वासाने वावरताना दिसते. तिला पाहून हे स्पष्टपणे जाणवते की, जर ती चित्रपट सृष्टीत आली तर एक उत्तम अभिनेत्री बनू शकते.
 

महिमा चौधरीची मुलगी अरीना हिची ड्रेसिंग सेन्स देखील लोकांना खूप आवडते. विशेषतः मुली तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. आपल्या आईप्रमाणेच ती सुंदर आणि निरागस दिसते.
 

( नक्की वाचा : Karisma Kapoor :21 वर्षांची झाली करिश्मा कपूरची मुलगी, वडिलांची होती लाडकी लेक, भावाशी खास बॉन्डिंग, Photos )