Malaika Arora : घटस्फोटानंतर मुलाचे संगोपन किती कठीण? मलायका अरोराने केला खुलासा

Malaika Arora : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा हिने घटस्फोटानंतरही तिचा मुलगा अरहान खानसोबत सह-पालनाचा (co-parenting) अनुभव कसा होता, हे सविस्तर सांगितलं आ

जाहिरात
Read Time: 2 mins
Malaika Arora : मलायकानं या मुलाखतीनंतर घटस्फोटानंतर पालक म्हणून आलेला अनुभव सांगितला आहे.
मुंबई:

Malaika Arora : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा हिने घटस्फोटानंतरही तिचा मुलगा अरहान खानसोबत सह-पालनाचा (co-parenting) अनुभव कसा होता, हे सविस्तर सांगितलं आहे. 'पिंकव्हिला'ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने अरबाज खानसोबतच्या तिच्या सध्याच्या नात्याबद्दल आणि मुलासाठी त्यांनी कशाप्रकारे प्रयत्न केले, याचा खुलासा केला.

लहानपणीच जबाबदारीची जाणीव

51 वर्षीय मलायकाला जबाबदारीची जाणीव लहाणपणीच झाली. सिंगल मदर असलेल्या तिच्या आईने (जॉयस पॉलीकार्प) तिला आणि तिच्या बहिणीला (अमृता अरोरा) वाढवले. यामुळे वयाच्या 11 व्या वर्षापासूनच मलायका आपल्या बहिणीची काळजी घेऊ लागली. आयुष्यातील याच अनुभवांनी तिला अधिक समजूतदार बनवले.  आई झाल्यानंतरही हा अनुभव कामाला आला, असं मलायकानं सांगितलं.   

नवऱ्यापासून वेगळे झाल्यानंतरचं आव्हान....

पतीपासून वेगळे झाल्यानंतर मुलाचे संगोपन करणे किती आव्हानात्मक असते, हे मलायकाने मान्य केले. ती म्हणाली, "पालकांनी आपली भीती मुलांवर कधीही लादू नये. सह-पालनाचे स्वतःचे असे आव्हान असते, पण त्यात समतोल साधणे खूप महत्त्वाचे आहे, असं तिनं स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : Sharmila Tagore: बड्या पडद्यावरील 'शर्मिला' खऱ्या आयुष्यात 'आयशा' कशा झाल्या? लेकीनं उघड केले गुपित )
 

मात्र, आता त्यांचा मुलगा अरहान 22 वर्षांचा झाल्याने गोष्टी सोप्या झाल्या आहेत. “तो आता मोठा झाला आहे. त्याला त्याच्या आईसोबत काय बोलायचे आणि वडिलांसोबत काय बोलायचे हे माहीत आहे. परिस्थिती स्पष्ट आहे आणि आम्ही आमच्या मर्यादा ठरवल्या आहेत,” असे मलायका स्पष्ट करते.

Advertisement

मुलासाठी जपलेले संबंध

मलायका आणि अरबाज यांनी वेगळे झाल्यावरही त्यांच्यातील मैत्री आणि सौहार्द कायम राखले आहे. "आम्ही वेगळे झालो, तरी आमच्या मुलासाठी आणि कुटुंबासाठी आम्ही एक चांगला संबंध राखला आहे. ही चांगली गोष्ट आहे. आज मी खूप आनंदी आहे,” असे ती सांगते. पालकत्वाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे, स्वतःची भीती किंवा भूतकाळातील नकारात्मक गोष्टींचा मुलावर भार न देणे, असे तिने सांगिततले.  अनेकदा आपण नकळतपणे आपली भीती मुलांवर लादतो. हे करू नये. मुलांना त्यांच्या पालकांचे दुःख कधीच कळू नये, असा सल्ला मलायकानं दिला.

( नक्की वाचा : Sunjay Kapur : 'माझ्यावर ओरडू नका...' 30,000 कोटींसाठी करिश्मा आणि प्रियाच्या वकिलांची कोर्टात जुगलबंदी,Video )
 

घटस्फोटानंतर स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याबद्दल अनेकांनी तिला 'स्वार्थी' म्हटले. यावर उत्तर देताना मलायका म्हणाली की, मला आरोग्यावर लक्ष देणं आवश्यक होतं. . कारण या निर्णयामुळेच ती आज अधिक आनंदी, स्थिर आणि एक चांगली आई बनली आहे. मुलासाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी पालकांनी स्वतः आनंदी असणे गरजेचे आहे, असे तिने स्पष्ट केले. 

Advertisement
Topics mentioned in this article