फिल्म इंडस्ट्री हादरली! मल्याळम अभिनेता Edavela Babu वर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मोठी कारवाई

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

दर्जेदार सिनेमांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेली मल्याळम चित्रपटसृष्टी सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचं (Malayalam Film Industry) काळं सत्य सांगणारा न्या. हेमा समितीचा अहवाल काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक झाला. त्यानंतर काही अभिनेत्रींनी जाहीरपणे त्यांना आलेले भयंकर अनुभव सांगितले. या सर्व प्रकरणाला आता आणखी एक वळण लागलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

केरळ पोलिसांनी बुधवारी (25 सप्टेंबर) मल्याळम अभिनेता एडवेला बाबूला (Edavela Babu) बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलं. बाबूनं यापूर्वीच एर्नाकुलम जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यामुळे अटकेनंतर लगेच त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. 

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील महिलांचं वास्तव मांडणारा न्या. हेमा समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर बाबू तसंच अभिनेता-आमदार एम. मुकेश आणि सिद्दकी यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहे होते. बाबू यापूर्वी अनेक वर्ष मल्याळम चित्रपट कलाकारांच्या (AMMA) संघटनेचा सचिव होता. हेमा समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर त्यानं या पदाचा राजीनामा दिला.

( नक्की वाचा : 'मिठी मारली, चुंबन घेतलं'... मल्याळम अभिनेत्रीनं सांगितला लैंगिक छळाचा अनुभव, दिग्गजांवर केले आरोप )
 

कोल्लमचे आमदार एम. मुकेश यांना अटक आणि जामीन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबूवरही ही कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणात समान तक्रार करण्यात आली होती.  AMMA चं सदस्यत्व मिळवण्यासाठी बाबू आणि मुकेश यांना 2010 साली संपर्क केला होता, अशी तक्रार महिला कलाकारानं केली होती. 

( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
 

जिल्हा न्यायालयानं का दिला जामीन?

'तक्राददारानं दिलेल्या वक्तव्यात कुठंही बळाचा वापर केल्याचा उल्लेख केलेला नाही. त्याचबरोबर तक्रारदार स्वत:च्या इच्छेनं मुकेशच्या कोचीमधील घरी गेली होती. तसंच तेंव्हा AMMA चे सरचिटणीस असलेल्या बाबूशी संपर्क साधला होता,' असं सांगत जिल्हा न्यायालयानं बाबूचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता.