Who is Radhika Bhide: गोड गळ्याची सौंदर्यवती! 'मन धावतंया' फेम राधिका भिडे कोण? कोकणशी खास कनेक्शन

i Popstar Fame Radhika Bhide: आय पॉपस्टारच्या मंचावर तिने मन धावतया हे गाणे गायले अन् ते सर्वांनाच प्रचंड आवडले. या गाण्याइतकाच राधिकाचा सुंदर मराठमोळा साजही सर्वांना भावला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Who is Radhika Bhide: 'मन धावतया तुझ्याचमागं, डोलतया तुझ्यासाठी..." फेसबुक, इन्टाग्राम जिकडे तिकडे सध्या गोड मुलीच्या सुंदर गाण्याने वेड लावले आहे. प्रत्येकाच्या स्टोरीला, स्टेटसला अन् प्लेलिस्टमध्ये हे गाणं हमखास पाहायला मिळत आहे. एका हिंदी कार्यक्रमात राधिका भिडे या सुंदर मुलीने गायलेल्या या गाण्याची तुफान चर्चा होत आहे. कोण आहे ही सुंदर मुलगी? कसं हीट झालं तिचं हे गाणं? वाचा सविस्तर... (Man Dhavataya Song Singer Radhika Bhide) 

कोण आहे राधिका भिडे? Who is Radhika Bhide

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील  'आय पॉपस्टार' या कार्यक्रमात गायलेल्या मराठी गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मन धावतंया हे गाणे जेव्हा आय पॉपस्टारच्या मंचावर सादर केले तेव्हा हिंदी समिक्षकांनाही भुरळ पडली. या सुंदर गाण्याचं आपल्या गोड आवाजात सादरीकरण करणारी मुलगी म्हणजे रत्नागिरीची लेक राधिका भिडे. (Radhika Bhide Beautiful Pics) 

Photo Credit: Instagram@Radhika Bhide

राधिका भिडे ही मुळची रत्नागिरीची असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईमध्ये राहत आहे. राधिका संगीत दिग्दर्शक, निर्माती, गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट  म्हणून ओळखली जाते. आय पॉपस्टारच्या मंचावर तिने मन धावतया हे गाणे गायले अन् ते सर्वांनाच प्रचंड आवडले. या गाण्याइतकाच राधिकाचा सुंदर मराठमोळा साजही सर्वांना भावला. नऊवारी साडी, नाकात नथ अन् चंद्रकोर असा राधिकाचा अस्सल मराठी साज तिच्या गोड आवाजाचं सौंदर्य वाढवणारा ठरला.  एमएक्स प्लेवर कार्यक्रमाचा प्रोमो सादर होताच तो तुफान व्हायरल झाला. 

आयपॉपस्टारची वेगळी थीम| I Popstar Theme

महत्त्वाचं म्हणजे, आयपॉपस्टार या कार्यक्रमाची थीम इतर रिअलिटी शोपेक्षा वेगळी आहे. कारण प्रत्येक आठवड्यात दिलेल्या थीमनुसार स्पर्धकांनी हे गाणे स्वत: लिहायचे त्याला संगीत द्यायचे आणि ते सादर करायचे. सोशल मीडियावर त्याला किती प्रसिद्धी मिळते, याचाही निकाल देताना विचार केला जाणार आहे. अशा आव्हानात्मक कार्यक्रमात राधिकाच्या या गाण्याने सर्वांनाच अक्षरश: वेड लावले. 

Advertisement