Marathi Actor Sachin Chandwade ends life: मराठी मनोरंजन विश्वातून एक हादरवुन टाकणारी बातमी समोर आली आहे. नवोदित मराठी अभिनेता सचिन चांदवडेने आयुष्य संपवल्याचं समोर आले आहे. सचिनचा आगामी असुरवन हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार होता, त्याआधीच या कलाकाराने आयुष्य संपवल्याने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. सचिनच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र रिलीजच्या तोंडावर जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Asurvan Actor Sachin Chandwade Death)
मराठी अभिनेत्याने आयुष्य संपवलं
समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी असुरवन या मराठी चित्रपटाचा अभिनेता सचिन गणेश चांदवडे याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन हा जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावचा होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने टोकाचा निर्णय घेतला. लवकरच त्याचा असुरवन हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, ज्याचे जोरदार प्रमोशनही सुरु होते. त्याआधीच या नवोदित कलाकाराने आयुष्य संपवल्याने सिनेविश्वात खळबळ उडाली आहे.
सचिन हा जमतारा २, असुरवन या चित्रपटांमध्ये झळकणार होता. अभिनयासोबत तो पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो पुण्यातील प्रसिद्ध कलावंत या ढोलताशा पथकामध्येही सहभागी व्हायचा. एक देखणा, उमदा कलाकार म्हणून त्याने ओळख तयार केली होती. अनेक मराठी कलाकारांसोबत त्याचे मैत्रीचे संबंध होते. मात्र चित्रपट रिलीज तोंडावर असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे...