Mumbai News: 'आपणच आपली ठासून घेतो...', मराठी अभिनेता भयंकर संतापला; VIDEO व्हायरल

अनेकांनी त्याने मांडलेल्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे. तसेच त्याच्या य रोखठोक भूमिकेचेही कौतुक केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शशांक केतकर हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारत शशांकने आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासोबतच तो विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडतानाही दिसतो. सध्या शशांकचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्याने मुंबईमधील मढ आयलंडमधील रस्ते आणि ट्रॅफिकचा अनुभव सांगत संताप व्यक्त केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाला शशांक केतकर?

'नमस्कार, महानगरपालिका आणि इतक्या एफिशिअंटली वर्क लोड मॅनेज करणारी आपली सगळी एकंदर राजकारणी माणसं. आता प्रेक्षक म्हणतील, ह्यालाच कसा नेहमी ट्राफिकचा त्रास होतो. मंडळी त्रास तुम्हालासुद्धा होतो, तुम्ही फक्त गप्प राहून सहन करता आणि मी बोलून सहन करतो. मुंबईच्ं स्पिरिट, मुंबईचं स्पिरिट या नावाखाली आपणच आपली जी काही ठासून घेतो ना, त्याचा आपल्यालाच कुठेतरी राग यायला पाहिजे.

'कारण या लाईनमध्ये उभ्या असणाऱ्या शेकडो माणसांचा वेळ, जीव, कष्ट, प्रदूषणामुळे होणारे आजार याची शून्य किंमत आहे. तुम्हाला वाटत असेल मढ आयलंड म्हणजे अतिशय सुंदर ठिकाण आहे, मुंबईतील... ते अजिबात सुंदर नाहीये, ते असं आहे. त्या ठिकाणचा अप्रोच रोड हा आहे..' अशा शब्दात अभिनेता शशांक केतकरने आपला संताप व्यक्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery: सिडकोची लॉटरी ऐन वेळी रद्द का झाली? मोठं कारण आलं समोर, आता नवी तारीख

"अनेक वर्ष मढच्या रस्त्यांची अत्यंत घाण अवस्था होती. आता कुठे कोणाला तरी जाग आलेली आहे आणि तोंडदखल का होईना, काम सुरु केले आहे. एक बाजू बंद ठेवतात, जी बाजू चालू आहे तिकडे ट्राफिक असते. रस्त्यातून सळ्या बाहेर आलेल्या असतात. बाईक्स पडतात. ह्या सगळ्या अत्यंत घाणेरड्या वातावरणात आम्ही शूटिंगला कसे पोहोचतो हे आमचं आम्हाला माहित.." असंही शशांकने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, अभिनेत्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. शशांक केतकर तुम्ही एक ऊत्तम कलाकार आहातच, तुम्हीजे सांगताय तेही तंतोतंत बरोबर आहे, असे म्हणत अनेकांनी त्याने मांडलेल्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे. तसेच त्याच्या य रोखठोक भूमिकेचेही कौतुक केले आहे.