स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून लोकप्रिय आहे. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारत स्वप्नीलने सिनेविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वप्नीलच्या चित्रपटांसोबतच त्याच्या हटके प्रोमोशनचीही मनोरंजन विश्वात चर्चा पाहायला मिळते. सध्या त्याच्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये तो ओरडून ओरडून मदत मागत आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा...
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते. दोघांनीही अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकलीत. लवकरच सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी पुन्हा एकदा एकत्रितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सुशीला- सुजीत असं या चित्रपटाचे नाव आहे. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
अशातच अभिनेता स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने चाहतेही चिंतेत पडलेत. या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी दोघेही घराच्या बाल्कनीत उभे राहून जोरजोराने मदतीसाठी ओरडत आहेत. वाचवा वाचवा.. आम्ही एका भयंकर संकटात सापडलोय, असे म्हणत दोघेही मदतीसाठी धावा करत आहेत.
हा व्हिडिओ पाहून चाहते काळजीत पडले मात्र चिंतेचे काही कारण नाही. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी सुशीला- सुजित या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. व्हिडिओमध्ये दोघेही मोठमोठ्याने ओरडून मदत मागत आहेत. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना चित्रपटगृहात जावे लागणार आहे.
दरम्यान, स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णीचा हा बहुचर्चित चित्रपट 18 एप्रिल रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सावधान…!!! या बाल्कनीत जाण्यासाठी सिनेमागृहाची दारं उघडणार.. असा खास कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, प्रोमोवरुन या चित्रपट सिनेमागृहात चांगलाच चर्चेत येणार असं दिसत आहे.