Gayatri Datar Engaged: 'हिरोची एन्ट्री', अभिनेत्री गायत्री दातार अडकणार विवाहबंधनात; पाहा खास फोटो

गायत्रीने इंन्टाग्रामवर पोस्ट करत तिचा साखरपुडा झाल्याची गूडन्यूज दिली आहे. सोबतच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोही शेअर केले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Marathi Actress Gayatri Datar Engaged: मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेते आदेश बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर आणि पुजा बिरारी, अभिनेत्री तेजस्वी लोणारी यांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना Good News दिली आहे. अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री गायत्री दातारचं ठरलं!

'तुला पाहते रे','अबीर गुलाल', 'बिग बॉस मराठी' अशा गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. गायत्रीने इंन्टाग्रामवर पोस्ट करत तिचा साखरपुडा झाल्याची गूडन्यूज दिली आहे. सोबतच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोही शेअर केले आहेत. 

Akshaye Khanna: विनोद खन्नांची दुसरी पत्नी; Dhurandhar अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मी कधीच आई...'

माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम दिवसांपैकी काही क्षण शेअर करताना मला खूप आनंद होत आहे, असं अभिनेत्री गायत्री दातारने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोबतच तिने 11.12.2025 तारीखही सांगितली आहे. याचदिवशी गायत्रीला बॉयफ्रेंडने प्रपोज केला असून दोघांनी साखरपुडाही उरकला आहे.

पोस्ट होतेय व्हायरल!

गायत्रीने या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या फोटोमध्ये गायत्रीच्या बोटामध्ये अंगठी दिसत आहे. त्यामुळे तिचा साखपुडा झाल्याचे स्पष्ट होत आहे. गायत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Advertisement

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गिरीजा प्रभू, अंकुर वाढवे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी गायत्रीला शुभेच्छा दिल्यात. गायत्रीच्या या पोस्टवर अभिनेता सुबोध भावेच्या कमेंटनेही लक्ष वेधले आहे. "भारी... अभिनंदन तुम्हा दोघांचही", असं त्याने म्हटले आहे. दरम्यान, गायत्रीचा होणारा पती नेमका कोण आहे? याबाबत मात्र अद्याप काही माहिती समोर आली नाही. 

Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ?