Actress Prachi Pisat Viral Post: प्राची पिसाट ही मराठी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. झी मराठी वाहिनीवरील तू चालं पुढे या मालिकेतून तिने लोकप्रियता मिळवली. प्राची सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले फोटो, तिच्या कामाबाबतच्या गोष्टी ती चाहत्यांशी शेअर करत असते. अलिकडेच प्राचीने शेअर केलेल्या एका स्क्रीनशॉटची जोरदार चर्चा होत आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी फेसबुकवरुन तिच्याकडे नंबरची मागणी करत फ्लर्ट करण्याची इच्छा आहे, असा मेसेज केल्याचा आरोप तिने केला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुदेश म्हशीलकर हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते आहेत.अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये काम करत आहेत. अशातच अभिनेत्री प्राचीने सुदेश म्हशीलकर यांच्या फेसबूकवरील मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा आहे, किती गोड दिसतेस.. असा मेसेज पाठवल्याचे दिसत आहे.
सुदेश म्हशीलकर यांनी केलेल्या या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीने "आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच, तिही गोड आहे.. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतं का? ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि आणि कॉल करशीलच.." असं लिहले आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.
तसेच प्राचीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुदेश म्हशीलकर यांचा आणखी एक मेसेज दिसत आहे, ज्यामध्ये त्यांनी "खूपच सेक्सी दिसायला लागली आहेस हल्ली, असाही मेसेज केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने चला आता विषय संपवूया, पण त्यांनी फेसबूकवरुन माफी मागावी आणि जर माझी मागायची इच्छा नसेल, वेळ नसेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते," असा इशाराही तिने या पोस्टमध्ये दिला आहे.