एकाचवेळी 65 चित्रपटांचं शूटिंग, वर्षात 19 चित्रपट प्रदर्शित, 'या' बॉलिवूड सुपरस्टारने रचला होता विक्रम

जर तुम्ही पण बॉलिवूडचे जबरदस्त चाहते असाल, तर ओळखून सांगा त्या सुपरस्टारचं नाव काय आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आजचे कलाकार वर्षाला एक किंवा दोन चित्रपट करतात. पण 1980-90 च्या दशकात अशीही वेळ होती, जेव्हा स्टार्स दर महिन्याला मोठ्या पडद्यावर दिसायचे. आज आम्ही तुम्हाला एका अशाच बॉलिवूड सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर एकाचवेळी 65 चित्रपटांचं शूटिंग केलं. फक्त ऐवढचं नाही तर  एका वर्षात 19 चित्रपट प्रदर्शित करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. जर तुम्ही पण बॉलिवूडचे जबरदस्त चाहते असाल, तर ओळखून सांगा त्या सुपरस्टारचं नाव काय आहे.

तो सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडमध्ये 'डिस्को किंग' म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सतत काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 1989 मध्ये त्यांनी 19 चित्रपट एकाच वर्षात प्रदर्शित केले. म्हणजेच जवळपास प्रत्येक महिन्यात त्यांचा कोणता ना कोणता चित्रपट थिएटरमध्ये दिसायचा. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 380 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. एक वेळ अशीही आली होती जेव्हा मिथुन चक्रवर्ती 65 पेक्षा जास्त चित्रपटांचं शूटिंग एकाचवेळी करत होते. जो आजही बॉलिवूडचा एक अनोखा विक्रम आहे.

नक्की वाचा - Manoj Jarange Patil Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील आज मुंबईत पोंहचण्याची शक्यता कमी

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1982 मध्ये 'डिस्को डान्सर' या चित्रपटाने केली. 80-90 च्या दशकात ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते.  त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. सुरुवातीच्या काळात मिथुन चक्रवर्ती नक्षलवादी चळवळीचा भाग होते. पण त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं. शिवाय त्यात ते यशस्वीही झाले. 

नक्की वाचा - Honeymoon trip: लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी हनिमूनला निघाली अभिनेत्री, दोन मुलांनंतर केली स्पेशल ट्रिप

आपल्या फिल्मी कारकिर्दीत मिथुन चक्रवर्ती यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपट केले. या वर्षी त्यांचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त, ते 'हाउसफुल 5' मध्येही दिसले होते.  ते डान्स रिॲलिटी शोचे जजही राहिले आहेत. मिथून चक्रवर्ती यांना मानणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. मिथून यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तरी त्यांचे चाहते सिनेमा गृहात आवर्जून हजेरी लावतात. 

Advertisement