Mr Indias Tina: अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा गाजलेला 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 1987 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कॉमेडी, ॲक्शन आणि रोमान्स या चित्रपटाची जमेची बाजू होती. पण त्याच बरोबर चित्रपटात लहान मुलांची एक टीम होती. ती टीम आणि त्यातील एक एक पात्र आज ही सर्वांच्या लक्षात आहे. यापैकीच एक,'टीना' हे पात्र कोणी विसरू शकणार नाही. हे पात्र साकारणारी चिमुकली हुजान खोदैजी तिच्या निरागसतेमुळे खूप लोकप्रिय झाली होती. हुजान म्हणजेच ती मुलगी जिचा चित्रपटात बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. आज ती 38 वर्षांनंतर कशी दिसत असेल असा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. हीच टीना आज सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे. तिचे सध्याचे फोटो पाहून चाहते चकित झाले आहेत.
चित्रपटापासून दूर
हुजान खोदैजी अभिनयाच्या जगापासून दूर असून तिने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलला प्रायव्हेट ठेवले आहे. तरीही, तिची काही नवीन छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. एका छायाचित्रात हुजान निळ्या रंगाच्या वेशभूषेत दिसत आहे. तिचे चेहऱ्यावरील गोंडस डिंपल्स (खळी) तिचे सौंदर्य अधिक वाढवत आहेत. तिच्या लहानपणीच्या निरागसतेची झलक अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसते. ज्यामुळे चाहते पुन्हा तिच्यावर फिदा झाले आहेत.
मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत
'मिस्टर इंडिया'मध्ये काम केल्यानंतर हुजान खोदैजी दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हुजानने अभिनयाऐवजी मार्केटिंग क्षेत्रात आपले करिअर निवडले आहे. सध्या त्या एका प्रसिद्ध कंपनीत जाहिरात एक्झिक्युटिव्ह (Advertising Executive) म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्या चांगले नाव कमावत आहेत. पण त्यांच्या सध्या व्हायरल झालेल्या फोटो मुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे लोभस सौंदर्याची नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे. जशी ती मिस्टर इंडीयामध्ये क्युट दिसत होती तशी आता ही ती दिसते.
मिस्टर इंडीयामुळे मिळाली ओळख
हुजान खोदैजी लहान वयात मिस्टर इंडियात साकारलेल्या भूमीकेने सर्वांचीच वाहवा मिळवली होती. समोर अनिल कपूर, श्रीदेवी सारखे तगडे कलाकार असताना कोणताही दबान न घेता तिने सहज आणि सुंदर अशी टीना साकारली आहे. ज्यावेळी तिचा बॉम्ब स्फोटात मृत्यू होतो त्यावेळी तिने केलेला अभिनय प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो. तो सीन आजही लोक विसरले नाहीत. तोच त्या चित्रपटाचा टर्निंग पाँईंट ठरतो.