हार्दिकसोबतच्या घटस्फोटातनंतर नताशानं सुरु केलं काम, कृणाल पांड्याची प्रतिक्रिया Viral

नताशानं तिच्या म्युझिक व्हिडिओचा टिझर फॅन्ससाठी शेअर केला आहे. त्यावर कृणाल पांड्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोट झाला आहे. या दोघांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर त्याबाबतची घोषणा केली. या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. बांगलादेश विरुद्ध ग्वाल्हेरमध्ये झालेल्या पहिल्या T20 सामन्यात हार्दिकनं आक्रमक बॅटिंग केली. त्याच्या बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियानं बांगलादेशला झटपट पराभूत केलं. हार्दिकप्रमाणेच नताशा देखील आता कामात व्यस्त आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नताशानं तिच्या म्युझिक व्हिडिओचा टिझर फॅन्ससाठी शेअर केला आहे. पंजाबी गायक प्रीत इंदरसोबतच्या गाण्यात नताशा दिसणार आहे. नताशानं त्याचं पोस्टर आणि टिझर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. नताशाचं टिझर पाहून हार्दिकचा भाऊ आणि क्रिकेटपटू कृणाल पांड्यानं प्रतिक्रिया दिली आहे.

( नक्की वाचा : घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकनं दिली प्रतिक्रिया )
 

नताशानं टिझर शेअर करताना म्हंटलं की, 'तेरे करके पर ग्रुव करण्यासाठी तयार व्हा. यूट्यूबर 8 ऑक्टोबर रोजी पूर्ण गाणं प्रदर्शित होईल' कृणाल पांड्यानं या व्हिडिओवर ब्लॅक हार्ट इमोजी कमेंटमध्ये शेअर केले आहे. कृणालची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हार्दिक आणि नताशानं 20 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली होती. या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे. अगस्त्यचं संगोपन एकत्र करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. या घटस्फोटानंतर नताशा सर्बियामध्ये गेली. ती नुकतीच मुलासह भारतामध्ये परतली आहे. दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्यानं अगस्त्यची भेट घेतली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Topics mentioned in this article