नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने देवीची पुजाआर्चा करत असतो. देवीवर प्रत्येकाची श्रद्धा असते. शिवाय नवरात्र म्हटली म्हणजे प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे रंग हे आलेच. त्या दिवशीचा तो रंग परिधान करण्याचा ट्रेंड आहे. त्यात कुणीही मागे नसते. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनंही नवरात्राच्या पहिल्याच दिवशी आपला साडी लुक शुट केला. तिच्या या सफेद साडीतील मनमोहक अदांना सोशल मीडियावर खुप प्रेम मिळालं आहे. शिवाय कमेंटचा पाऊस ही पडला आहे.
नवरात्राचा पहिला रंग सफेद आहे. त्यामुळे तेजस्विनी लोणारीनं हिनं पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शुट चर्चेत आहे. तिच्या अदानी सर्वांना मोहीत केलं आहे. सफेत साडी आणि हातात गुलाबाचं फुल हा लुक सर्वांनाच आवडला आहे. तिने तिचे हे फोटोशुट सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रीया ही दिल्या आहेत. काहींनी नैसर्गिक सौंदर्य अशी प्रतिक्रीया दिली आहेत. तर काहींनी सफेद फुलाच्या हातात गुलाबाचे फुल अशी ही प्रतिक्रीया नोंदवली आहे.
तेजस्विनी लोणारी ही एक चित्रपट आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने पद्मिनीच्या भूमिकेत चित्तोड की रानी पद्मिनी का जोहूर मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आहे. ती बिग बॉस मराठी 4 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सध्या ती तिच्या नवरात्रातील पांढऱ्या रंगाच्या साडीत मामोहक शूट मुळे चर्चेत आहेत. त्यामुळे नवरात्राच्या नऊ दिवस तेजस्विनी वेगवेगळ्या रुपात तिच्या चाहत्यांसमोर येईल अशी अपेक्षा तिचे चाहते करत आहेत.