अभिनेत्री नेहा धूपिया आपला वाढदिवस या वेळी अत्यंत खास आणि रोमँटिक पद्धतीने साजरा करत आहे. ती तिचा पती अंगद बेदी सोबत रोम आणि फ्लॉरेन्सला गेली आहे. या ट्रिपला त्यांनी लग्नानंतर 8 वर्षांनी 'पहिलं हनिमून' असे नाव दिले आहे. 2018 मध्ये लग्न झाल्यापासून या जोडप्याला अधिकृतपणे हनिमूनला जाण्याची संधी मिळाली नव्हती. लग्नानंतर कामाच्या व्यस्ततेमुळे आणि दोन मुलांच्या संगोपनात त्यांचे आयुष्य इतके व्यस्त झाले होते की त्यांना कधीही सुट्टी मिळाली नाही. पण या वर्षी नेहाने आपला वाढदिवस अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी तिची आवडती जागा, म्हणजेच फ्लॉरेन्सची निवड केली.
या खास क्षणी नेहा म्हणाली, “लग्नानंतर 8 वर्षांनी आम्ही अखेर आमचं पहिलं हनिमून निश्चित केलं आहे. या वाढदिवशी, मी चांगले आरोग्य, यश आणि कुटुंबासोबत मौल्यवान वेळ घालवण्याची इच्छा करते. माझ्या करिअरसाठीही हे येणारे वर्ष खूप व्यस्त आणि रोमांचक असणार आहे.” तिने आपल्या या ट्रीपचे काही फोटो ही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात ती आपल्या बिंदास मुडमध्ये दिसत आहे.
मोकळ्या आणि स्पष्ट विचारांसाठी ओळखली जाणारी नेहा नेहमीच मनातील गोष्टी सांगायला मागे-पुढे पाहत नाही. या वर्षीचा तिचा वाढदिवस आणि ही ट्रिप तिच्या याच विचारांना दर्शवते की आयुष्य एन्जॉय केले पाहिजे. रोम आणि फ्लॉरेन्ससारख्या सुंदर आणि रोमँटिक शहरांच्या पार्श्वभूमीवर, नेहा आणि अंगदचा हा प्रवास प्रेम, आनंद आणि सुंदर आठवणींनी भरलेला आहे. या वर्षीचा वाढदिवस नेहा धूपियासाठी तिच्यासारखाच खास आणि अविस्मरणीय असेल. आशा आहे की नेहा आपल्या सुट्ट्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहील.